मासेमारी बंद असल्याने खवय्यांची बोंबील, सुकट, जवळा घेण्यासाठी बाजारात गर्दी

जून महिन्यापासून मासेमारी बंद असल्याने बाजारात ओल्या माशांचा दुष्काळ आहे. त्यामुळे खवय्यांनी सुक्या मासळीकडे आपला मोर्चा वळवला आहे. सुक्या मासळीच्या मागणीत वाढ झाली असून वसई-विरारमधील मासळी बाजारांमध्ये सुकी मासळी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात

दरवर्षी पावसाळ्यात सलग दोन ते अडीच महिने होणारी मासेमारी बंदी लक्षात घेता या काळात उदरनिर्वाहासाठी मच्छीमार उन्हाळ्यापासूनच तयारीला लागतात. या काळात मोठय़ा प्रमाणावर मासळी खारवून सुकवली जाते. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने ग्राहकांना सुक्या मासळीशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे ही सुकवलेली मासळी याच दरम्यान मोठय़ा प्रमाणावर वसईच्या बाजारात विकण्यासाठी उपलब्ध करण्यात येते. सध्या वसईच्या बाजारपेठांमध्ये सुक्या मच्छीचे आगमन झाले असून वसई, विरार, अर्नाळा, पापडी, आगाशी येथील मासळी बाजार सुक्या मासळीने गजबजून गेला आहे. अर्नाळा हे मासेमारी बंदर असल्याने ओल्या आणि सुक्या माशांचा व्यवसाय येथील कोळी महिला मोठय़ा प्रमाणावर करतात. ओल्या मासळीचा बाजार येथे पूर्वापार आहेच, परंतु ओल्या मासळीबरोबर येथील सुकी मासळीदेखील चविष्ट असते. मासळी सुकवण्याची पद्धत ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची असते.

अर्नाळा येथील पद्धत विशिष्ट असल्याने येथील सुके बोंबील आणि जवळा यांचा मोठय़ा प्रमाणावर खप होतो. विशेष म्हणजे या ठिकाणी मुंबईहून ग्राहक सुकी मासळी खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

महागाईचे काटे

सुकी मासळी खरेदीसाठी ग्राहाकांची गर्दी होत असली तरी महागाईने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ४०० ते ४५० रुपये शेकडा किमतीने सुके बोंबील विकण्यात येत आहेत. जवळा, सुकट, कोलंबी यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. मासळी महाग असली तरी ही सुकी मच्छी विकत घेण्यासाठी बाजारात ग्राहकांची चढाओढ पाहण्यास मिळत आहे.

सुक्या मासळीचे भाव

  • सुके बोंबील : ४०० ते ४५० रुपये शेकडा
  • जवळा, करंदी : ३५० रुपये किलो
  • बांगडे : १५० ते २०० रुपये एक नग
  • मुशी : १०० रुपये जोडी
  • कोलंबी : ५०० ते ६०० रुपये किलो