कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेसोबत घडलेल्या प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात महिला पोलिसांचा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या महिलांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी परिमंडळ स्तरावर हे कक्ष स्थापण्यात येणार आहेत. या कक्षांच्या माध्यमातून महिलेची तक्रार पोलीस ठाण्यात योग्य प्रकारे हाताळली गेली का? योग्य दिशेने तपास सुरू आहे का? याचा आढावा घेतला जाईल.

ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात पीडित महिला विनयभंगाची तक्रार नोंदविण्यासाठी गेली होती. त्या वेळी तक्रार दाखल करण्यासाठी एकही महिला पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित नव्हती. यासंदर्भात पीडित महिलेने केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. त्यात महिलेच्या आरोपात तथ्य असल्याची बाब समोर आली. या पाश्र्वभूमीवर पाचही मंडळाच्या स्तरावर महिला पोलिसांचा हा कक्ष काम करणार आहे. एक महिला पोलीस निरीक्षक किंवा साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा या कक्षात समावेश आहे.

pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा