आंबिवलीत रेल्वेवरील पुलाची ऐतिहासिक निर्मिती

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर एल्फिन्स्टन आणि आंबिवली येथील पुलाची निर्मिती करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आंबिवली येथील रेल्वेवरील पादचारी पुलाची ऐतिहासिक उभारणी गुरुवारी आंबिवली स्थानकात पार पडली. अवघ्या पंधरा मिनिटात लष्कराचे अभियंते आणि जवानांनी हा पुल उभा केला. देशाच्या प्रत्येक संकटात धावून जाणाऱ्या लष्कराने पहिल्यांदाच रेल्वेवरील पूल उभारणीचे काम पूर्ण केले. या पुलावरील उर्वरित सिमेंट काँक्रीट तसेच अन्य कामे पूर्ण करून तो ३१ जानेवारीपर्यंत पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.

1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Mega block on Sunday on Western Railway
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
pune railway station marathi news, pune station crowd marathi news
पुणे: रेल्वे प्रवाशांची रोजचीच लढाई! तिकीट असूनही गाडीत चढता येईना…

आपत्कालीन परिस्थितीत देशाला सावरण्यात अनुभवी असलेल्या लष्कराला पहिल्यांदाच रेल्वेच्या पूल उभारणीसाठी पाचारण करण्यात आले होते. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या यंत्रणेद्वारे पूल उभारणीतील वेळ आणि अडचणी लक्षात घेऊन लष्कराची मदत घेण्यात आली. त्यानुसार गुरुवारी आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाच्या उभारणीसाठी रेल्वेतर्फे पाच तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे येथील रेल्वे सेवा १० वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. रेल्वेच्या मदतीने साडेदहाच्या सुमारास लष्कराला कामाच्या ठिकाणचा ताबा देण्यात आला. लष्करातील अभियंत्यांच्या बॉम्बे सॅपर्सच्या पथकाने कामाच्या ठिकाणचा ताबा घेऊन काही मिनिटातच काम सुरू केले. आंबिवली येथे १२ फूट रुंद आणि ६० फूट लांबीचा पूल उभारण्यात येणार होता. या पुलाच्या सांगाडय़ाचे वजन १५. ८४ टन इतके होते. बंगालमधून तयार केले गेलेले याचे भाग यापूर्वीच येथे आणण्यात आले होते. तसेच यापूर्वीच येथे दोनही बाजूंना लोखंडी खांब उभारण्यात आले होते. सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ९ मिनिटांच्या विक्रमी वेळेत लष्कराच्या जवानांनी येथे गर्डर टाकला. त्यानंतर काही मिनिटातच त्याची जोडणीही पूर्ण करण्यात आली. अवघ्या १५ मिनिटात लष्कराचे काम पूर्ण झाले. काम यशस्वीरीत्या पूर्ण होताच लष्कराच्या जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. तसेच ज्या बॉम्बे सॅपर्सचे अभियंते आणि जवानांनी या कामात सहभाग घेतला होता, त्या पथकाचाही या पहिल्यावाहिल्या कामानंतर जयजयकार करण्यात आला. या वेळी एक ब्रिज कमांडर, एक कमिशन अधिकारी, पाच सल्लागार आणि ४० जवानांचा या कामाला हातभार लागला. या वेळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. आंबिवली येथील पूल हा लष्कराकडून बांधला गेलेला देशातील पहिलावहिला पुल ठरला आहे.

एल्फिन्स्टन खरे आव्हान

लष्करातर्फे येत्या काही दिवसांत एल्फिन्स्टन स्थानकात सर्वात मोठा पूल बांधण्यात येणार आहे. यात १०० फुटांचे दोन तर ४० फुटांचा एक असे तीन मोठे भाग जोडले जाणार आहेत. तब्बल १३ रुळांवरून मोठय़ा भागात हे काम होणार असल्याने हे काम अधिक आव्हानात्मक असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हे कामही एक विक्रम असेल.