News Flash

फुलपाखरांच्या जगात : इंडियन सनबीम

नर आणि मादी दोन्हींच्या पंखांची खालची बाजू चकचकीत पांढऱ्या रंगाची असते.

इंडियन सनबीम हे लायकेनिडे कुळातील म्हणजे ज्यांना ब्लू फुलपाखरे म्हणून ओळखले जाते, त्या कुळामधील साधारण मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. जवळपास संपूर्ण भारतभर आणि त्याचबरोबर शेजारील श्रीलंका, ब्रह्मदेश आणि त्यापुढील प्रदेशातही हे फुलपाखरू सापडते.
tv05या फुलपाखरांमध्ये नर आणि मादी फुलपाखरांचे रंग निरनिराळे असतात. नरांच्या पंखांची वरची बाजू ही अगदी तांबूस म्हणजे लख्ख घासलेल्या तांब्याच्या भांडय़ांसारखी असते तर मादी फुलपाखरांच्या पंखांची वरची बाजू गडद तपकिरी रंगाची असते आणि त्यावर मध्यभागी मोठे पांढरे धब्बे असतात.नर आणि मादी दोन्हींच्या पंखांची खालची बाजू चकचकीत पांढऱ्या रंगाची असते. त्यावर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे अगदी बारीक ठिपके असतात.या फुलपाखराची मादी गुंज, गरुडवेल, करंज यांसारख्या झाडांवर अंडी घालते. बाहेर येणाऱ्या सुरवंटाचा रंग पानाच्या रंगाशी इतका मिळताजुळता असतो की सुरवंट वेगळा ओळखताच येत नाही. या फुलपाखरांच्या कोषामधून अतिशय बारीक आवाज येत असतो हा आवाज कसा काय येतो याविषयी अजून संशोधन होणे आहे.
हे फुलपाखरू फुलावर बसून पंखांची उघडझाप करते, तेव्हा त्याच्या चमकदार पांढऱ्या पंखांमधून अचानक तांबडा रंग डोकावतो हे बघताना ढगामधून हलकेच बाहेर येणाऱ्या सूर्यकिरणांचीच आठवण येते. त्यामुळे त्याचे नांव इंडियन सनबीम असे पडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 12:37 am

Web Title: indian sunbeam butterfly
Next Stories
1 दळण आणि ‘वळण’ : ठाण्याची मेट्रो अन् मुंबईची सोय
2 निमित्त : ब्रिटिशकालीन पूल- शोध आणि बोध
3 शहरबात कल्याण : गर्दी आणि कोंडीचे जंक्शन
Just Now!
X