‘युवोन्मेष’ आणि ‘ठाणे मानबिंदू’ पुरस्कारांचे वितरण; शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रम

ठाणे : संगीताची मेजवानी आणि इतर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा भरणा असलेल्या इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सवामध्ये यंदा वेगवेगळ्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी ‘युवोन्मेष’ आणि ‘ठाणे मानबिंदू’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. गडकरी रंगायतन येथे येत्या शनिवारी सायंकाळी होणाऱ्या या रंगोत्सवात ठाणेकरांचा गौरव केला जाणार आहे.

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

ठाणे शहराच्या सांस्कृतिक मांदियाळीत इंद्रधनु संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. वर्षांतून एकदा रंगणारा इंद्रधनु रंगोत्सव सोहळा हा ठाणेकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रिबदू राहीला आहे.  शनिवार, १८ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या सोहळ्यानिमित्ताने पुरस्कार सोहळाही संपन्न होणार आहे. यावेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना युवोन्मेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. निरनिराळ्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या तरुणाईला १९९८ पासून इंद्रधनु महोत्सवामध्ये ‘युवोन्मेष’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा साहित्य क्षेत्रात आश्वासक कामगिरी करणाऱ्या मिताली मीलन या युवा लेखिकेला युवोन्मेष पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे. तसेच, यंदाचा सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार युवा हार्मोनियम वादक सागर साठे यांना प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी गौरवण्यात आलेले युवोन्मेष पुरस्कार प्राप्त तरुण निरनिराळ्या क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करत असल्याचे इंद्रधनु संस्थेने सांगितेले. या पुरस्कारांसाठी दरवर्षी त्या त्या क्षेत्रातील तीन तज्ज्ञांची समिती गठित करून त्यांच्यातर्फे एका व्यक्तीची निवड करण्यात येते. त्याचबरोबर विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवणाऱ्या एका ज्येष्ठ ठाणेकर व्यक्तीला प्रतिवर्षी इंद्रधनुतर्फे ‘ठाणे मानबिंदू’ या पुरस्काराने गौरविण्यात येते.

यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षणतज्ज्ञ अ.गो. टिळक यांना ‘ठाणे मानबिंदू’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

काय?-इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव

कुठे?-गडकरी रंगायतन, ठाणे</strong>

कधी?-शनिवार, १८ जानेवारी.     सायं. ५ वा. पासून.