औद्योगिक आणि कामगार अदालतमध्ये ९२ प्रकरणे निकाली

ठाणे जिल्ह्य़ातील विविध कारखान्यांमध्ये काम करीत असलेल्या काही कामगारांची प्रकरणे कारखाना व्यवस्थापनाबरोबर झालेल्या वादामुळे औद्योगिक न्यायालयात दाखल झाली आहेत. वर्षांनुवर्षांची ही प्रकरणे औद्योगिक व कामगार न्यायालयात प्रलंबित आहेत. अशा प्रकारच्या १९१ प्रकरणांचा लवकर सोक्षमोक्ष लावावा म्हणून ठाण्यातील औद्योगिक  आणि कामगार न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ही प्रकरणे अंतिम निकालासाठी ठेवण्यात आली होती.

यामधील ९२ प्रकरणे कारखाना व्यवस्थापन आणि कामगार, संघटना यांच्यात सामंजस्य करून मिटविण्यात आली. या सर्व प्रकरणांच्या माध्यमातून सुमारे एक हजार कामगारांना एकूण ७ कोटी रकमेचा लाभ मिळाला आहे.