चहा हे भारतीयांचे राष्ट्रीय पेय. सकाळची सुरुवात असो, की पाहुण्यांचं स्वागत असो अथवा गप्पांचा फड असो. चहाशिवाय ते शक्यच होत नाही. या चहाचे विविध प्रकार आहेत. त्यातील इराणी चहा हा एक आहे. मुंबईतून दुर्मीळ होत चाललेल्या इराणी हॉटेलात हा खास इराणी चहा मिळतो. हाच इराणी चहा आता वसईत मिळू लागला. वसई पश्चिमेच्या समतानगर येथे नवानी बन-मस्का कॅफे आहे. इराणी चहासोबत बन-मस्का, मावा केक हे कॅफेचे खास वैशिष्टय़ आहे.

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
China claim on Arunachal Pradesh and its hegemony strategy continues
लेख: चीनचा कावा वेळीच ओळखा..
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

वसईतल्या ‘इराणी चहा’च्या हॉटेलचा जन्मही तसा हटके विचारातून झाला. वसईत राहणारा मुकेश मेवानी हा सिंधी तरुण. कॉल सेंटरमध्ये काम करायचा. पण नोकरी करायची नाही, असा ठाम निर्णय घेऊन तो बाहेर पडला. कुठला व्यवसाय करावा याचा विचार करत असताना त्याच्या डोक्यात इराणी चहा वसईकरांना दिला तर असा विचार आला. इराणी चहा बनवायला शिकवणार कोण? मग मुंबईतील काही हॉटेलवाल्यांची ओळख काढून तो फिरू लागला आणि इराणी चहा बनवायला शिकला. चहा विकणार म्हणून सुरुवातीला घरच्यांनी खूप विरोध केला; परंतु मुकेश ठाम होता. चहाच विकायचा असेल तर आमचे नाव लावू नकोस, असे घरच्यांनी सुनावले होते. आता इराणी चहा वसईत लोकप्रिय झाल्याने मुकेशचा व्यवसाय स्थिरस्थावर झालाय आणि त्याच्या घरचे ही सुखावले आहेत. वसई पश्चिमेच्या समतानगर येथे नवानी इराणी चाय नावाचे छोटा कॅफे आहे. मुकेश नवानी नावाचा तरुण हे हॉटेल चालवतो.. तीन वर्षांपासून हे इराणी चहाचे सेंटर प्रसिद्ध झाले आहे. मुंबईतून आणलेला खास मावा केक, विद्युत भट्टीत तयार केलेला खुसखुशीत बन लोण्यासोबत लज्जत वाढवतो.

इराणी चहा असा बनतो

हा चहा बनवायवा एक तास लागतो. इराणी चहा घट्ट केलेल्या दुधापासून तयार होतो. एका तांब्याच्या टोपात दूध उकळवले जाते. हा चहा बनविण्यासाठी दोन तांब्याची भांडी वापरली जातात.

एका टोपात पाणी, साखर आणि चहा पावडर टाकून उकळवले जाते. दुसऱ्या टोपात घट्ट केलेले दूध उकळवले जाते. या दुधात इराणी मसाला टाकला जातो. दोन स्वतंत्र भांडय़ांत दूध आणि चहाचे मिश्रण उकळवले जाते आणि चहा देण्यापूर्वी ते एकत्र करून दिले जाते. हा चहा लगेच थंड होत असल्याने तो इथेच प्यावा लागतो. इराणी चहा करताना गॅस कधीच बंद होत नाही. सतत तो उकळवला जात असतो. गॅस बंद झाला तर प्रमाण चुकते आणि चहाची चव निघून जाते, असे मुकेश सांगतो. चहाच्या टपरीत सहसा महिला वर्ग फिरकत नाही. पण नवानी इराणी चहाचे हॉटेल स्वच्छ, आकर्षक असल्याने कौटुंबिक गर्दी दिसते. महाविद्यलयातील तरुण-तरुणी खास इराणी चहा पिण्यासाठी येत असतात.

नवानीकडे तयार होणारे बन म्हणजे पाव हे इलेक्ट्रिक शेगडीत तयार केले जातात. त्यामुळे तो नरम असतो. त्याला मस्का हा अमुलचा लावला जातो. त्यामुळे त्याचा दर्जा चांगला असतो, असे मुकेशने सांगितले. मुंबईत मिळणारा खास मावा केक इथे मिळतो. त्यामुळे फक्कड इराणी चहा, बन-मस्का आणि मावा केक खाण्यासाठी लोकांची इथे गर्दी असतो.

७० टक्के लोक हे नियमित गिऱ्हाईक आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहून हॉटेलची व्याप्ती वाढविण्याचा मुकेशचा विचार आहे. टपरीवरीवर मिळणाऱ्या चहापेक्षा वेगळ्या चहाची लज्जत चाखण्यासाठी या नवानी कॅफेला भेट द्यायला हरकत नाही.

नवानी बनमस्का कॅफे समतानगर, वसई रोड ()