News Flash

इतिहासाचा अभिमान आता टी-शर्टवरून स्वेटरवर!

शिवाजी महाराज आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला पराक्रम याविषयी तरुणांच्या मनात अभिमान आहे.

यंदाच्या थंडीत तरुणांची ‘जगदंब हुडी’ला पसंती
आपल्या ऐतिहासिक परंपरांविषयी मनामध्ये असलेला अभिमान अंगावरील कपडय़ांद्वारे मिरविणाऱ्या तरुणांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. त्यातूनच लोकप्रिय ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा प्रभाव तरुणांच्या पोशाखावर दिसून येतो. गेली काही वर्षे टी शर्ट्स पुरता मर्यादित असलेला हा इतिहासाविषयीचा जाहीर अभिमान आता स्वेटर किंवा हुडीवरही अवतरला आहे. यंदाच्या हिवाळ्यामध्ये ‘जगदंब’ हे नाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या ‘जगदंब हुडी’ ठाण्यातील तरुण वापरताना दिसू लागले आहेत. ब्रॅण्डेड दुकानांपासून ते रस्त्यावरील पायरेटेड हुडीजमध्येही जगदंब हुडीज अधिक प्रमाणात दिसून येतात.
शिवाजी महाराज आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला पराक्रम याविषयी तरुणांच्या मनात अभिमान आहे. त्यातूनच तरुण मंडळी कपाळावर चंद्रकोर कोरतात, कानात भिकबाळी घालतात. त्याचप्रमाणे टी-शर्टवर विविध प्रकारचे श्लोक अथवा शिवचरित्रातील ओजस्वी वाक्ये छापून घेतात. इतिहासाविषयीचे हे प्रेम आणि अभिमान आता स्वेटर्स आणि हुडीमध्येही दिसून येते. शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले ‘जगदंब हुडीज’ही सर्वसामान्य हुडीजप्रमाणे ऊबदार असतात. यामध्ये केशरी रंगाचा वैशिष्टय़पूर्ण वापर करण्यात आला आहे. हुडीच्या टोपीला केशरी रंगाच्या मऊ फरचा वापर केलेला आहे. या हुडीमध्ये सर्वाधिक करडा रंग आढळून येतो. त्यावर दोन्ही बाजूंनी केशरी रंगाच्या बारिक पटय़ांचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर या हुडीजवर विविध श्लोकही लिहिलेले आढळतात. या हुडीचा सर्वाधिक वापर महाविद्यालयीन तरुण, मोटारसायकलस्वार, गिर्यारोहक करतात. त्यामुळे यंदा बाजारांमध्ये तिबेटच्या लोकांनी थाटलेल्या स्वेटर्स विक्रीच्या दुकानांमध्ये नेहमीच्या पारंपरिक हुडीपेक्षा ‘जगदंब हुडी’ना सर्वाधिक मागणी आहे.

ब्रॅण्डेडपेक्षाही वरचढ विक्री
पूर्वी तरुण मंडळी पुमा, आदिदास यांसारख्या ब्रॅण्डेड हुडीची मागणी करत. परंतु आता अनेक जण ‘जगदंब हुडी’ला पसंती देतात. त्यामुळे इतर हुडीच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. ‘जगदंब’ हा एक वेगळाच ब्रॅण्ड सध्या तरुणांना भुरळ घालत आहे. त्याच्या पायरेटेड कॉपीही रस्त्यांवरील विक्रेत्यांकडे आहेत. त्यामुळे त्याचा अधिक प्रसार झाला आहे.
महम्मद शेख, विक्रेता

जगदंब’ ही आमच्या ग्रुपची ओळख..
आम्ही तीन मित्र नेहमीच गड-किल्ल्यांवर गिर्यारोहणासाठी जातो. थंडीच्या काळात डोंगरावर अधिक गार वातावरण असल्याने अशा प्रकारच्या कपडय़ांची गरज भासते. ‘जगदंब’ हुडीचे वैशिष्टय़ म्हणजे ते काही विशिष्ट रंगामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही तिघांनीही एकाच रंगाचे हुडी विकत घेतले आहेत. आम्ही शिवरायांचे भक्त असल्याने ही हुडी घालून मिरवल्याने एक वेगळीच अभिमानाची भावना जागृत होते.
विवेक राऊत, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:06 am

Web Title: jagdamb printed t shirt came in market
Next Stories
1 ठाण्यात आता प्रशस्त रस्ते!
2 ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी
3 गुन्हे वृत्त; बँकेत पैसे भरण्यास जाताना लुबाडले
Just Now!
X