पत्नी दारू पिण्यास पैसे देत नाही म्हणून तिचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबरनाथ येथील रिक्षाचालक बाळू राजगुरू याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एम. वाघमारे यांनी पाच र्वष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. योगेंद्र पाटील यांनी काम पाहिले.
अंबरनाथ येथे राहणारा रिक्षाचालक बाळू राजगुरू याचा सोळा वर्षांपूर्वी सुनीता हिच्याबरोबर विवाह झाला होता. त्याने नंतर रिक्षा चालविणे बंद केले. काम न करता घरात तो बसून राहू लागला. पतीच्या या उद्योगामुळे सुनीताने घर खर्च भागला पाहिजे म्हणून नोकरी पत्करली. या काळात बाळूला दारूचे व्यसन लागले. पत्नीने कष्ट करून आणलेल्या पैशावर तो डल्ला मारू लागला. या सततच्या त्रासाला सुनीता कंटाळली होती. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. सुनीताच्या आईने बाळूने आपल्या मुलीला ठार मारल्याचा आरोप शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत केला होता. या प्रकरणी कल्याण न्यायालयात अ‍ॅड. पाटील यांनी पाच साक्षीदार तपासले.