News Flash

ठाण्याच्या हिरानंदानी परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा, ३५ लाखांचे दागिने लंपास

हिरानंदनी इस्टेट हा ठाण्यातील उच्चभ्रू परिसर असून याठिकाणी असणाऱ्या लीलाज ज्वेल पॅराडाईज या दुकानावर चोरट्यांनी दरोडा टाकला

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातील एका ज्वेलर्सवर दरोडा घालून चोरट्यांना ३५ लाखांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. हिरानंदनी इस्टेट हा ठाण्यातील उच्चभ्रू परिसर असून याठिकाणी असणाऱ्या लीलाज ज्वेल पॅराडाईज या दुकानावर चोरट्यांनी दरोडा टाकला. यामध्ये चोरट्यांनी ३५ लाखांहून अधिक किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी ज्वेलर्स आणि बाजूच्या सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्हीदेखील लंपास केले. त्यामुळे पोलिसांना याप्रकरणाच्या तपासात अडथळे येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 2:47 pm

Web Title: jeweller robbed in thane city
टॅग : Gold
Next Stories
1 ठाणेकरांनो.. नव्या बसफेऱ्या विसरा!
2 ठाण्यातील तलावांचा सहा महिन्यांत कायापालट
3 स्कायवॉकच्या कोपऱ्यावर पुन्हा कचरा
Just Now!
X