भाजप हा सुपारीबाजांचा पक्ष असून सत्तेसाठी बदलापुरात भाजप कार्यकर्त्यांने शिवसेना उपशाखाप्रमुखाची केलेली हत्या हा प्रकार घृणास्पद असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.
आव्हाड यांनी गुरुवारी बदलापुरात दोन प्रचारसभा घेतल्या. या वेळी आव्हाड यांनी भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे व स्थानिक नेते राम पातकर यांच्यावर सडकून टीका केली. तीन वर्षांपूवी कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मी मागणी केली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. राम पातकर यांनी घोटाळा केल्याने त्यांना बेडय़ा घालून तुरुंगात जावे लागले होते याची त्यांनी आठवण करून दिली. भाजप कार्यकर्त्यांने हत्या केलेल्या उपशाखाप्रमुख केशव मोहितेला एकनाथ शिंदे हे विसरले असून या शिवसैनिकाच्या कुटुंबीयांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले आहे. विधानसभेत मोहिते यांच्या हत्येचा साधा उल्लेख शिंदे यांनी केला नाही, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 18, 2015 12:01 pm