News Flash

पत्रकार व. मा. देशपांडे यांचे निधन

ष्ठ पत्रकार व. मा. देशपांडे (८७) यांचे शनिवारी वृध्दापकाळाने निधन झाले.

ज्येष्ठ पत्रकार व. मा. देशपांडे (८७) यांचे शनिवारी वृध्दापकाळाने निधन झाले. देशपांडे त्यांचे बंधू अरविंद यांच्या घरी वास्तव्यास होते. मागील वर्षभर ते आजारी होते. पन्नासच्या दशकात दैनिक ‘मराठा’मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर नवशक्तिमध्ये ते वृत्तसंपादक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे ते एक साक्षीदार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ावर त्यांनी लिखाण केले होते.

 

एटीएम फोडणारा उल्हासनगरात जेरबंद
कल्याण : उल्हासनगरमधील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम यंत्र शनिवारी पहाटे एक दरोडेखोर फोडत असल्याचे बँकेच्या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत होते. ही हालचाल तात्काळ कक्षातील कर्मचाऱ्याने उल्हासनगर पोलिसांना कळविली. पोलिसांनी तत्पर हालचाल केल्याने, एटीएम फोडणाऱ्या लुटारुला अटक करण्यात आली. प्रदीप अहिरराव असे लुटारूचे नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 2:22 am

Web Title: journalist v m deshpande passed away
Next Stories
1 ‘कारगील’मधील ४९ इमारतींवर हातोडाच!
2 १५२ प्रार्थनास्थळांचा रस्तेविस्तारात अडसर
3 २१ चवींच्या पुरणपोळय़ा आता संकेतस्थळावर
Just Now!
X