14 July 2020

News Flash

कल्याण डोंबिवली महापालिकेचा लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत

तक्रारदार हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या साफसफाईचे ठेके घेतात.

कल्याण : शौचालय साफसफाई देयकाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करणारा कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभारी कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव (५६) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या साफसफाईचे ठेके घेतात. त्यांच्या ७ लाख ९८ हजार रुपयांच्या शौचालय साफसफाई देयक कागदपत्रांवर बाळासाहेब जाधव यांची स्वाक्षरी हवी होती. यासाठी जाधव याने ठेकेदाराकडून १६ हजार रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराने याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. या तक्रारीची पडताळणी करून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार रुपयांची लाच घेताना जाधव याला रंगेहात पकडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 6:52 am

Web Title: kalyan dombivli bribe corrupt executive engineer detained akp 94
Next Stories
1 शिंदेंच्या दबावापुढे जयस्वाल नमले!
2 टिटवाळय़ावर प्रदूषणाचे मळभ!
3 दिवा, मुंब्य्राचा कर आखडताच!
Just Now!
X