12 December 2017

News Flash

दोन कोटीच्या मालमत्ता १ रुपयात खरेदी

आपणास कोणी काही करु शकत नाही, अशा गुर्मीत असणाऱ्या विकासकांना व जमीन मालकांना हा

प्रतिनिधी, कल्याण | Updated: June 4, 2016 2:42 AM

कल्याण डोंबिवली पालिकेची मालमत्ता कराची एकूण २ कोटी ६८ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम थकविणाऱ्या सहा विकासकांच्या मालमत्ता पालिकेने १ रुपया नाममात्र किमतीने शुक्रवारी लिलावबोलीने खरेदी केल्या. आपणास कोणी काही करु शकत नाही, अशा गुर्मीत असणाऱ्या विकासकांना व जमीन मालकांना हा मोठा दणका पालिकेने पहिल्यांदाच दिला आहे.
थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या लिलाव करण्यासाठी अत्रे रंगमंदिरात लिलाव बोलीचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी आयोजित केला होता. यावेळी मालमत्ता खरेदीसाठी एकही लिलाव बोलीदार हजर न राहिल्याने पालिकेने थकबाकीदारांच्या मालमत्ता एक रुपया बोलीने ताब्यात घेतल्या.
मालमत्ता जप्त झालेल्यांमध्ये विकासक रामदास गोंधळे व रिटा सिंग पटेल, मालमत्ता थकबाकी ३५ लाख १६ हजार, सिताबाई पाटील व रिटा सिंग पटेल, थकबाकी ६६ लाख ४९ हजार, अर्जून पाटील व आशुतोष डे, देवीदास दुबे, थकबाकी २८ लाख ७२ हजार, रिटा सिंग पटेल, कंबर कन्स्ट्रक्शन, थकबाकी ७६ लाख २३ हजार, देवकीबाई गोंधळे व रिटा सिंग पटेल, थकबाकी ३८ लाख ९८ हजार. प्रसाद जोशी व एस. एस. म्हात्रे यांनी ३९ लाख थकबाकीमधील ३० लाखाची रक्कम भरणा केल्याने त्यांचे नाव लिलावातून वगळण्यात आले.

First Published on June 4, 2016 12:38 am

Web Title: kalyan dombivli municipal corporation buying two million of assets
टॅग Kdmc