कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गाई-गुरे, बकरा बाजारात करोना संसर्ग रोखण्याचे कोणतेही नियम पाळण्यात येत नसल्याने जूनपासून सुरू करण्यात आलेला पशुधन बाजार बंद करण्यात येत असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. ग्राहक-विक्रेत्यांनी ऑनलाइन नोंदणी करून आपले व्यवहार पूर्ण करावेत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप लागवडीचा हंगाम सुरू झाला. शेतक ऱ्यांना शेतीसाठी बैल याशिवाय गाई, म्हशींची आवश्यकता असते. जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी बक ऱ्या, बोकड पाळतात. हा विचार करून पालिकेने जूनमध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामधील

पशुधन बाजार सुरू करण्यास मुभा दिली होती. मागील काही दिवसांपासून या बाजारात व्यापारी अंतर नियम पाळत नाहीत. अनेक व्यापाऱ्यांच्या तोंडावर मुखपट्टी नसते. याशिवाय बैलबाजार, सांगळेवाडी हा परिसर करोनाच्या तीव्र संक्रमित क्षेत्रात येतो. या भागात कृषी उत्पन्न समिती आणि पशुधन बाजार भरतो. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने बाजार समितीमधील पशुधन बाजार सुरू ठेवण्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे.