News Flash

कल्याणमध्ये खड्ड्याचा पाचवा बळी

कल्याणमध्ये खराब रस्त्यांमुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. आत्तापर्यंत खराब रस्त्यांमुळे चार जणांना जीव गमवावा लागला असून शुक्रवारी गांधारी पुलावर खड्ड्यामुळे पाचवा बळी गेला.

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याणमध्ये खड्डे आणि पेव्हर ब्लॉकमुळे अपघातांचे सत्र सुरुच असून गांधारी पुलावर खड्ड्यामुळे दुचाकीवरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. कल्पेश जाधव असे या तरुणाचे नाव असून दुचाकीवरुन पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली सापडून त्याचा मृत्यू झाला.

कल्याणमध्ये खराब रस्त्यांमुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. आत्तापर्यंत खराब रस्त्यांमुळे चार जणांना जीव गमवावा लागला असून शुक्रवारी गांधारी पुलावर खड्ड्यामुळे पाचवा बळी गेला. कल्याणजवळील गावात राहणारा कल्पेश जाधव हा तरुण दुचाकीवरुन जात होता. गांधारी पुलावर पोहोचल्यावर त्याची दुचाकी खड्ड्यात गेली. यामुळे कल्पेशचा तोल गेला आणि तो दुचाकीवरुन खाली पडला. याच दरम्यान पाठीमागून ट्रक येत होता. या ट्रकखाली सापडून त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कल्याणमध्ये २ जून रोजी पाच वर्षांच्या आरवचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता. शिवाजी चौक ते सहजानंद चौक दरम्यान वडिलांसोबत दुचाकीवरुन जात असताना खड्ड्यामुळे मागे बसलेला आरव खाली पडला. मागून येणाऱ्या ट्रकखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. तर गेल्या आठवड्यात मनीषा भोईर या खासगी शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. या आठवड्यात भिवंडी कोनगाव येथे मालवाहू ट्रक रिक्षावर पलटल्याने एका प्रवाशाचा तर मलंग रस्त्यावर ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. खड्ड्यामुळे तो व्यक्ती रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या ट्रक खाली सापडून त्याचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 11:54 am

Web Title: kalyan pothole five death gandhari bridge kalpesh jadhav kdmc pwd
Next Stories
1 वाहतूक व्यवस्था खड्डय़ात!
2 प्लास्टिकबंदीसाठी शाळांचाही पुढाकार
3 पाणी इथले ओसरत नाही!
Just Now!
X