21 September 2018

News Flash

आयुक्तांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

HOT DEALS
  • Apple iPhone 7 Plus 32 GB Black
    ₹ 59000 MRP ₹ 59000 -0%
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 24790 MRP ₹ 30780 -19%
    ₹4000 Cashback

उल्हासनगर महापालिका आयुक्तांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांवर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या रिपाइं (आठवले गट), भारिप, पीआरपी यांच्यासह काँग्रेस आणि  राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांना दालने आणि  सोयीसुविधा पालिकेने पुरवल्या होत्या. मात्र अचानक या पाचही पक्षांची दालने आयुक्त निंबाळकर यांनी ६ जुल रोजी सील केली होती. याप्रकाराने रिपाईच्या पाचही पक्षांचे नगरसेवक संतप्त झाले होते. या पाच पक्षांनी अवैधपणे दालने बळकावल्याने ही कारवाई केल्याचे त्यावेळी आयुक्तांचे म्हणणे होते.

पोलिसांनीही कारवाई न केल्याने त्यांच्या विरोधात भालेराव यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे धाव घेतली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन न्यायालयाने आयुक्त राजेंद्र  निंबाळकर, परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, साहाय्यक पोलीस आयुक्त विकास तोटावार, आणि पीआय अविनाश काळदाते या चौघांविरोधात अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्याची माहिती भालेराव यांनी दिली.

दालन सील केल्याचा वाद

दालन सील केल्याच्या वादातून रिपाइंचे गटनेते आणि  शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आणि महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यात वाद होवून संतापाच्या भरात आयुक्त निंबाळकर यांनी हीन दर्जाच्या जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. पोलीसांकडे आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

First Published on November 15, 2017 2:12 am

Web Title: kalyan session court legal actions against police officers