नाताळच्या सणाच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी गावागावात कॅरल सिंगिग सुरू झाली आहे. येशूचे आगमन होत आहे ही शुभ वार्ता संगिताच्या माध्ममातून पोहोचवताना वसईच्या तरुणांनी पर्यावरण वाचवा हा संदेश देत आहे. यंदाचा नाताळ हा हिरवा नाताळ म्हणून साजरा केला जात आहे.

*२५ डिसेंबरला नाताळच्या आठवडाभर आधी गावागावातून कॅरल सिंगिग ची पुरातन प्रथा आहे. प्रभू येशूचा आगमन होणार आहे, तयारीला लागा असा संदेश दिला  जातो.

*वसईच्या ठिकठिकाणच्या गावात ही कॅरल सिंगिग सुरू झाल्याचे दिसत आहे. रमेदी येथील तरूणांनी एकत्र येऊन ‘िजगल ऑल द वे’ या पथकाची स्थापना केली  असून हे पथक कॅरल सिंगिग मध्ये पर्यावरण वाचवा असा संदेश देत आहेत.

*या पथकासोबत असलेल्या सांता क्लॉजने मुलांना आणि लोकांना कागदी पिशव्या वाटल्या. प्लॅस्टिकचा वापर टाळा, झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश ते देत आहेत.

*गावाच्या प्रमुख चौकात आणि घरांसमोर हे पथक कॅरल सिंगिग करत आहेत.  या हिरव्या नाताळच्या संदेशाचे लोकांनी स्वागत केले आहे.

*या कॅरल सिंगिंग साठी गेले महिनाभर हे तरूण तयारी करत होते. पारंपारिक गीते, प्रभू येशूची स्तुती गिते आदींचाही त्यात समावेश आहे.