18 January 2019

News Flash

दुबईतील आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन्स ट्रॉफीवर ठाणेकरांचा झेंडा

७ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई

कराटे चॅम्पियनशीप स्पर्धा गाजवणारे ठाणेकर खेळाडू

दुबईत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. सनब्राईट कराटे अकादमीच्या कराटेपटूंनी या स्पर्धेत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली. याचसोबत खुल्या गटातील ग्रँड चॅम्पियनशीप चषकावर ठाण्याच्या दिपाली सुर्वे यांनी तब्बल दहा देशांतील कराटेपटूंना मात देत विजेतेपद मिळवलं आहे. दुबईतील शहाब अल अहील क्लबमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. यात भारतासह युएई, नेपाळ, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, इजिप्त, नेदरलँड या देशांतील सुमारे १२०० कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातून ४५ स्पर्धक सहभागी झाले होते, यातील ७ खेळाडू हे ठाण्याचे होते.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची माहिती पुढीलप्रमाणे – 

१) दीपाली संदीप सुर्वे

(पदक – कुमीते आणि काता प्रकारात २- सुवर्ण तसेच ग्रँड चॅम्पियनशिप)

२) संदीप सयाजी सुर्वे

(पदक – कुमीते प्रकारात सुवर्ण तर काता प्रकारात कांस्य पदक)

३) कु. प्रियवंदा मौर्य

(पदक – कुमीते आणि काता प्राकारात २ सुवर्ण)

४) कु. सर्वेश सराफ

(पदक – कुमीते प्रकारात सुवर्ण तर काता प्रकारात रौप्य)

५) कु. परशुराम अयप्पन

(पदक –  काता प्रकारात सुवर्ण तर कुमीते प्रकारात रौप्य)

६) कु. सार्थक महाजन

(पदक – कुमीते प्रकारात रौप्य तर काता प्रकारात कांस्य) 

 

 

First Published on May 16, 2018 2:28 pm

Web Title: karate players from thane perform brightly in dubai karate championship trophy