डोंबिवली पूर्व भागातील सावरकर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शिस्तप्रिय सोसायटय़ांमधील आणखी एक स्वयंशिस्तीचे धडे गिरवणारी सोसायटी म्हणजे हिरव्या कोंदणातील कौस्तुभ सोसायटी. तिच्याविषयी..

कौस्तुभ सोसायटी, सावरकर रस्ता, डोंबिवली पूर्व

Vasudev, Vasai, voting,
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
pune on nagar road bhivari village robbers threatened with weapons beaten women looted
पुणे : नगर रस्त्यावरील बिवरी गावात दरोडा; महिलांना मारहाण करून १६ लाखांची लूट
Raju Shetty
शेतकरी, कामगारांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी विजयी करा – राजू शेट्टी यांचे आवाहन

साधारण चार-पाच दशकांपूर्वी मुंबईतील नोकरदार मंडळींनी डोंबिवलीत भूखंड खरेदी करून तिथे बहुमजली इमारती उभारल्या. कौस्तुभ सोसायटी त्यापैकी एक. रिझव्‍‌र्ह बँकेतील कर्मचाऱ्यांनी येथे आपली वसाहत उभारली. या मंडळींनी डोंबिवलीतील सावरकर रस्त्यावरील वाडेकर यांचा भूखंड खरेदी केला. या भूखंडावर १९७८ मध्ये विकासकाच्या माध्यमातून इमारत उभारणीस सुरुवात केली. पगार आणि कर्ज या दोन उत्पन्नाच्या स्रोतावर प्रत्येकाला घर खरेदी करायचे असल्याने इमारत उभारताना, बेसुमार उधळपट्टीचे नियोजन न करता आटोपशीर खर्चात इमारत पूर्ण करण्यात आली. इमारत उभारणीचे काम सुरू झाले तो काळ सिमेंट तुटवडय़ाचा होता. काळ्या व्यवहारात सिमेंट विकण्याचा धंदा तेजीत होता. आपल्या इमारतीला भेसळयुक्त सिमेंटचा कणही लागता कामा नये म्हणून सोसायटी सदस्यांनी काही दिवस काम थांबवले, कारण त्यांना इमारतीच्या दर्जात कोणतीही तडजोड करायची नव्हती. ‘आरबीआय’मधील बहुतांशी कर्मचारी मुंबई, डोंबिवली अशा विखुरल्या ठिकाणी राहत होते. त्यात नोकरी सांभाळून इमारत उभारणीच्या कामाच्या ठिकाणी फेऱ्या मारणे ही कामेही त्यांना प्रामाणिकपणे पार पाडायची होती. आरबीआय कर्मचारी वसंत पाठक, रमेश जोशी हे चेंबूरला राहत होते. ते सुट्टीच्या दिवशी वेळ काढून डोंबिवलीत येऊन इमारतीच्या उभारणीच्या कामावर देखरेख करीत होते. विकासकाने आपल्या मर्जीने इमारतीचे काम पूर्ण करण्यापेक्षा ते सोसायटी सदस्यांच्या मनासारखे कसे होईल, याकडे सदस्यांचा कटाक्ष होता. सिमेंटचा तुटवडा भासू लागल्याने कौस्तुभ सोसायटीचे प्रमोटर वसंत पाठक, रमेश जोशी, गजानन शेटय़े व इतर मंडळी अस्वस्थ होती. दादा पांडे हे आरबीआय कर्मचारी संघटनेचे नेते व सामाजिक कार्यकर्ते होते. या सर्व मंडळींनी इमारतीसाठी लागणारे चांगल्या दर्जाचे सिमेंट व सिमेंटची अडचण दूर करण्यासाठी तत्कालीन खासदार रामभाऊ म्हाळगी यांची भेट घेतली. खासदार म्हाळगी यांनी हालचाली करून चंद्रपूर येथून कौस्तुभ सोसायटीला सिमेंट मिळेल अशी व्यवस्था केली. मग पाठक, शेटय़े, जोशी यांच्यासह अन्य मंडळी चंद्रपूर येथे गेली. तिथे खासदारांनी सुचविलेल्या ठिकाणाहून सिमेंट खरेदी करून ते सिमेंट पुन्हा वाटेत विकले जाऊ नये, भेसळयुक्त सिमेंट गोणी ट्रकमध्ये घुसविण्यात येऊ नयेत म्हणून त्या ट्रकमध्ये बसून चंद्रपूर ते डोंबिवली असा प्रवास केला. त्या कष्टप्रद, घामाच्या पैशातून आणि पक्क्या सिमेंटमधून उभी राहिलेली कौस्तुभ सोसायटी आज ३७ वर्षांनंतरही दिमाखात उभी आहे.

सध्या सोसायटीचे नियोजन अध्यक्ष गजानन शेटय़े, सचिव विवेक पाठक, कोषाध्यक्ष गजानन केतकर व कार्यकारिणी मंडळातर्फे पार पाडले जाते. ‘आरबीआय’ कर्मचाऱ्यांची सोसायटी असल्याने बँकेत काम करताना कर्मचारी मंडळी एकेकपैशाचा हिशेब ठेवतात. तोच संस्कार सोसायटी कारभारात कर्मचाऱ्यांच्या अंगी पाहायला मिळतो. ऐंशीच्या दशकात आखीवरेखीव लेजर बँकांमध्ये भरण्यात येत होती. तशाच हिशेबाप्रमाणे सोसायटीचा जमाखर्च गोल गरगरीत, सुटसुटीत अक्षरांत रामचंद्र हर्डिकर यांच्याकडून लिहिण्यात येतो. त्या आखीवरेखीव पद्धतीत कोठेही एक पैशाला इकडेतिकडे पळण्यास वाव नाही.

‘कौस्तुभीयन’ या व्हॉट्सग्रुपमधून सोसायटीतील सदस्य सोसायटीतून परदेशात वास्तव्यात, अन्य शहरांत असलेल्या सदस्यांच्या नियमित संपर्कात असतात. दिवाळीचा फराळ घराघरांत फिरवण्याची प्रथा इमारतीमधील बंद दार पद्धतीमुळे संपुष्टात आली आहे; पण कौस्तुभ सोसायटीतील प्रत्येक सदस्य दिवाळीच्या दिवशी घरातील फराळ सोसायटीच्या गच्चीवर नेऊन सामूहिक पद्धतीने खाण्याला प्राधान्य देतो. अनेक वर्षांची ही परंपरा आजही पाळली जाते. जुलैमध्ये सोसायटीचा वर्धापन दिन असतो. त्या दिवशी सामूहिक पूजा करण्यापेक्षा प्रत्येक सदस्याला व त्याच्या सदनिकेला पूजेचा मान मिळावा म्हणून प्रत्येक सदस्याच्या घरात दर वर्षी पूजा केली जाते. सर्व सदस्य या कार्यक्रमात सहभागी होतात. इतर सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे केले जातात. सोसायटी सोडून अन्यत्र गेलेल्या सदस्यांना उत्सवी कार्यक्रमांना मेहूण (उत्सवी जोडपे) म्हणून बोलावले जाते. ती मंडळीही अशा आमंत्रणाची वाट पाहत असतात. नायजेरियात असलेली सोसायटीतील एक ताई पुण्यात नातेवाईकांकडे आली, की आवर्जून डोंबिवलीत येते. बाहेर गेलेल्या मंडळींचे हे जणू काही माहेरघर आहे.

पालिकेच्या सूतिकागृहातील डॉ. वैशाली देशमुख, धर्म-गीतेच्या अभ्यासक डॉ. ललिता नामजोशी, कॅरमपटू शिल्पा जोशी-पळणीटकर, बँकर प्रसाद साने, विवेक पाठक आणि सुना म्हणून सोसायटीत आलेल्या सदस्या अशा उच्चशिक्षित मंडळींच्या निवासाचा सोसायटीला वारसा आहे.