26 February 2021

News Flash

कडोंमपा कर्मचाऱ्यांची गणेशोत्सवातच ‘दिवाळी’

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवातच दिवाळीचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१३ हजार रुपयांचा बोनस जाहीर
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागेल हे लक्षात येताच महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवातच दिवाळीचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यावर अशा प्रकारे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात कायदेशीर अडचणी उभ्या राहू शकतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा महापौर कल्याणी पाटील यांनी केला. या निर्णयानुसार दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना १३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले आहे.
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना यंदा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जाईल का, याविषयी प्रश्नचिन्हे उभे राहिले होते. असे असताना महापौर कल्याणी पाटील यांनी पालिका कर्मचाऱ्यांना घाईने १३ हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेच्या सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा वार्षकि बोजा पडणार आहे. कर्मचारी संघटनेच्या मागणीवरून महापौर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. स्थानिक संस्था कराचे उत्पन्न बंद झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. मोठय़ा प्रमाणावर गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या विकासकामांचे पैसे देतानाही प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील नव्या बांधकामांना परवानगी देता येत नाही. त्यामुळे शहर विकास विभागाचे यंदाच्या वर्षीचे उत्पन्नाचे स्रोत आणखी कमी झाले आहेत. महसुली उत्पन्न अपेक्षेएवढे वसूल होत नाही. विकास कामांसाठी निधी नाही. कर्मचाऱ्यांना पगार देणे प्रशासनाला मुश्कील झाले आहे. असे असताना गणपती सण सुरू असतानाच, दिवाळीचा बोनस जाहीर करून पालिकेने कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिवाळी बोनस देताना कामगार संघटनेबरोबर पालिकेच्या चर्चेच्या फे ऱ्या होतात. पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून बोनस जाहीर केला जातो. यावेळी घाईने बोनस जाहीर करून पालिका निवडणुकीची संधी सत्ताधारी शिवसेनेने साधली आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी प्रशासनाकडे २१ हजार बोनस देण्याची मागणी केली होती. तडजोडीने ही रक्कम तेरा हजार करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 12:11 am

Web Title: kdmc employee get 13 thousand bonus
टॅग : Diwali Bonus
Next Stories
1 गणेशोत्सवावर निवडणुकीचा रंग
2 मनसेच्या नगरसेवकांचे ‘स्व’निर्माण
3 डोंबिवलीत पेन्सिलपासून गणपती साकार
Just Now!
X