News Flash

करोना रुग्ण सेवा कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच

कल्याण-डोंबिवली पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

संपूर्ण देश सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका देशातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना रुग्ण सेवेत असलेल्या महापालिका, परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा करोना संसर्ग होऊन मृत्यू झाला तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांचे सुरक्षा विमा कवच योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही योजना कल्याण-डोंबिवली पालिकेतील कर्मचाऱ्यांना लागू करावी म्हणून कर्मचाऱ्यांची मागील दोन महिन्यांपासून मागणी होती.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील साडेतीन महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी सेवा देत आहेत. मार्च-एप्रिल-मेमध्ये कर्मचाऱ्यांनी दररोज सुमारे एक लाख ७५ हजार भोजन पाकीट वाटपाचे काम केले. त्यानंतर घरोघरची रुग्ण तपासणी सव्‍‌र्हेक्षण, संशयित, बाधितांना विलगीकरण केंद्र, रुग्णालयात नेणे अशी जोखमीची कामे पार पाडली. ही कामे करताना काही पालिका अधिकारी-कर्मचारी करोना संसर्गाने बाधित झाले. उपचार घेऊन ते सुखरूप घरी परतले. कामावर येऊन पुन्हा करोना रुग्ण सेवेत दाखल झाले आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत करोना रुग्ण सेवेतील कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग किंवा आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली तर केंद्र शासनाने अशा कर्मचाऱ्यांसाठी ‘राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत’ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी एप्रिलमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना कळविले आहे. मुंबईसह इतर पालिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली. त्याच वेळी कल्याण डोंबिवलीतील कर्मचारी आपल्या सुरक्षेसाठी ही योजना लागू करण्याची मागणी करीत होते. पालिका हद्दीतील वाढती करोना रुग्ण संख्या आणि त्यात कर्मचारी करीत असलेले जोखमीचे काम विचारात घेऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना संसर्गाची बाधा होऊन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दि न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीच्या अपघात विमा योजनेतून ही रक्कम कुटुंबीयांना मिळणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही विमा रक्कम मिळण्यासाठी विमाधारकाचा मृत्यू करोनाची बाधा आणि या कामाशी संबंधित संसर्गाने झाला असल्याचे कुटुंबीयांना प्रमाणित करावे लागणार आहे. कर्मचारी मृत्यूच्या तारखेपासून १४ दिवस अगोदर कामावर हजर असला पाहिजे. या योजनेसाठी कोणताही हप्ता विमा कंपनीकडे भरणे आवश्यक नाही. ही रक्कम थेट केंद्र शासनाकडून अदा करण्यात येईल. या योजनेचा लाभ ३० सप्टेंबर २०२० पर्यंत किंवा केंद्र शासनाने मुदतवाढ केल्यास त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

लाभ कोणाला?

महापालिका कर्मचारी, परिवहन सेवा कर्मचारी, करोना रुग्ण सेवेत कार्यरत असणाऱ्या रुग्णालयांतील कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, कंत्राटी, रोजंदारी, बाह्ययंत्रणेद्वारे (आऊटसोर्स) उपलब्ध करून घेतलेले कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका.

कल्याण-डोंबिवली पालिका, परिवहन उपक्रमातील करोना रुग्ण सेवेतील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या विमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:31 am

Web Title: kdmc provide 50 lakh insurance cover for employee working in corona patient services zws 70
Next Stories
1 जिल्ह्य़ातील पोलीस दल करोनाच्या विळख्यात
2 कोविड रुग्णालयांच्या निर्मितीस दिरंगाई
3 मीरा-भाईंदरमध्ये टाळेबंदीचा फज्जा
Just Now!
X