१५५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटिसा

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील १५५ कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कामावरून काढून टाकण्यासंबंधी नोटिसा बजाविल्या आहेत. या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उपक्रमाच्या १९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासनाकडून अशा पद्धतीची कारवाई केली जात आहे.

sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांनी पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. परिवहन विभागातील कामकाजाचा आढावा घेत असताना आयुक्तांना येथील अनियमितता, शिवाय बेशिस्त कारभार आढळून आला. त्यामुळे उपक्रमाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी झाडाझडती घेतली. उपक्रमाचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांना आयुक्त वेलरासू यांनी उपक्रमाचे कामकाज सुधारा अन्यथा कारवाईला सज्ज व्हा असा इशारा दिल्याचे वृत्त आहे. कर्मचारी काम करीत नसतील, गैरहजर राहत असतील तसेच दांडय़ा मारत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले. तसेच बेशिस्त कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा द्या, अशा सूचनाही वेलरासू यांनी केल्या.

आयुक्तांच्या आदेशानंतर परिवहन व्यवस्थापकांनी तातडीने पावले उचलत बेशिस्त कर्मचाऱ्यांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. उत्पन्न देणाऱ्या बस मार्ग तपासणीत हलगर्जीपणा करणाऱ्या १९ मार्ग तिकीट तपासकांना (तिकीट चेकर) दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. उत्पन्न देणाऱ्या मार्गावर वेळेवर बस न सोडणे, बस सोडण्यात टंगळमंगळ करणे असा ठपका असलेल्या १३ वाहतूक नियंत्रकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. याशिवाय सतत दांडय़ा मारणे, कामावर वेळेवर न येणे, सक्षमतेने प्रवासी बस सेवा न देणे, रजा नामंजूर असताना सुट्टी घेणे अशा ३५ चालक, ५९ वाहकांवर दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. व्यवस्थापनाला कोणतीही सूचना न देता दीर्घकालीन गैरहजर राहणाऱ्या १३ चालक, १६ वाहकांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मे, जूनमध्ये अनेक कर्मचारी गैरहजर होते. दांडय़ा मारीत होते. अशा कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार करून सुमारे ९० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. काही कर्मचारी दीर्घकालीन गैरहजर आहेत. त्यांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन अंतिम कारवाई करण्यात येणार आहे. दैनंदिन कामकाजात चालढकल पद्धतीने काम करणाऱ्यांवर कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे.

देवीदास टेकाळे, महाव्यवस्थापक, केडीएमटी