20 September 2020

News Flash

‘केळवे बीच फेस्टिव्हल’मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल

स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्थानिक लोककला आणि पर्यटनाचा प्रसार

|| नीरज राऊत

स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्थानिक लोककला आणि पर्यटनाचा प्रसार

स्थानिक स्वादिष्ट आणि चमचमीत पदार्थाचा आस्वाद घेत निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर साप्ताहिक सुटी साजरी करण्याचा तुमचा बेत असेल तर या आठवडय़ात पालघरजवळील केळवे समुद्रकिनाऱ्याला भेट द्या. कारण २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी ‘केळवे बीच फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून विविध लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात आहे. केळवे पर्यटनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

केळवा समुद्रकिनारी सुरूच्या झाडांची मोठी बाग आहे. या बागेत आणि समुद्रकिनाऱ्यावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून केळवे येथील पर्यटन क्षेत्राचा प्रसार, स्थानिकांना रोजगारनिर्मिती तसेच गावातील व परिसरातील विविध लोककला, विविध ज्ञातींतील स्वादिष्ट व पारंपरिक खाद्यपदार्थाचा प्रसार करण्याचा उद्देश या महोत्सवाच्या आयोजकांचा आहे.

या महोत्सवादरम्यान स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून पर्यटन व्यवसायात यशस्वी झालेल्या महिलांचे अनुभव यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

खाद्यपदार्थाचे आकर्षण

केळवे महोत्सव खवय्यांसाठी खास ठरणार आहे. या भागातील प्रसिद्ध उकाडहंडी, लाडू, मोदक, पानाचतील भाकऱ्या तसेच इतर अनेक स्थानिक पदार्थ या महोत्सवातील आकर्षण राहणार आहे. मांसाहारी नागरिकांसाठी या भागात मिळणारी ताजी मासळी आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ आकर्षण ठरणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:27 am

Web Title: kelva beach festival
Next Stories
1 मानीव अभिहस्तांतरणाचे भिजत घोंगडे
2 रस्ता रुंदीकरणामुळे पाणीटंचाई
3 पुण्यात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मंगळवारपासूनच हेल्मेटसक्ती
Just Now!
X