अभिनेत्री केतकी माटेगावकरची प्रतिक्रिया

‘कलाकारांवर प्रेक्षक प्रेम करत असतात. व्यग्र कामामुळे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आम्हा कलाकारांना शक्य नसते. ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने लोकांशी संवाद साधता आला. ‘लोकसत्ता’तर्फे दर्जेदार उपक्रमांचे आयोजन सतत होत असते. या उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी व्हायला आवडेल,’ अशा शब्दात गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचा बक्षीस वितरण समारंभ विवियाना मॉल येथील सुलोच दुकानात शनिवारी पार पडला. अभिनेत्री केतकी माटेगावकर, सुलोच दुकानाचे मालक दीपांकर बोस आणि सिद्धार्थ सारंगी यांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

loksatta-sopping-festival (2)

२२ जानेवारीला सुरू झालेल्या लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दुकानांमध्ये खरेदी केलेल्या काही भाग्यवान विजेत्यांना सेलिब्रिटी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शनिवारी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभातसुद्धा विजेत्यांचा उत्साह दिसून आला. खरेदी केलेल्या वस्तूंवर अनपेक्षित बक्षीस मिळाल्याने विजेत्यांचा आनंद द्विगुणित होता. अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या हस्ते बक्षीस मिळाल्याने वेगळाच आनंद आहे, अशी चर्चा विजेत्यांमध्ये पाहायला मिळाली. विजेत्यांना बक्षीस मिळाल्याचा आनंद आणि आवडत्या अभिनेत्रीसोबत छायाचित्र काढण्याची संधी यामुळे सुलोच दुकानामध्ये शनिवारी उत्साहाचे वातावरण होते. यावेळी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या झेना डिझाईन, सरलाज ब्युटी सलोन या दुकानांमध्ये केतकीने भेट दिली. अभिनेत्री केतकी माटेगावकरचा ‘फुंतरु’ सिनेमा येत्या ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ विजेते

  • सुमेश पिलाई, ठाणे – १ ग्रॅम सोन्याचे नाणे
  • संदेश कदम, ठाणे – ईस्त्री
  • रुपाली ठाकरे, ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० गॅ्रम चांदीचे नाणे
  • विजया केंकरे, ठाणे – लगुन आणि वागड्सचे गिफ्ट वाऊचर
  • जोजिथा जयकृष्णा, मुंबई – कलामंदीर आणि  वागाड्सचे गिफ्ट वाऊचर
  • योगेश देसाई, विटावा – कॉर्डलेस फोन आणि रेमंडचे गिफ्ट वाऊचर
  • कोमल करमळकर, ठाणे – वागाड्स आणि रेमंडचे गिफ्ट वाऊचर
  • लक्ष्मी रेड्डी, लोअर परेल – वामन हरी पेठे अ‍ॅंड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे
  • लक्ष्मण निचिते, आसनगाव – कलामंदीर आणि रेमंडचे गिफ्ट वाऊचर
  • सिमरा बाबू, कल्याण – सुलोच गिफ्ट वाऊचर व२० गॅ्रम चांदीचे नाणे
  • संदीप पांचाळ- सुलोच गिफ्ट वाऊचर व २० गॅ्रम चांदीचे नाणे
  • हेमंत धनकर, कल्याण – कलामंदीर आणि वागाड्सचे गिफ्ट वाऊचर
  • जागृती शिर्के, ठाणे – नोकिया पॉवरबँक आणि रेमंड गिफ्ट वाऊचर
  • श्रुतिका लकेश्री  – वामन हरी पेठे अ‍ॅंड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे
  • प्रमोद माने, ऐरोली – कलामंदीर आणि वागाड्सचे गिफ्ट वाऊचर
  • संगीता देशमुख, डोंबिवली – हेडफोन आणि रेमंड गिफ्ट वाऊचर
  • सुपदा राणे, ठाणे – वागाड्स आणि रेमंडचे गिफ्ट वाऊचर
  • निता धनकर – वामन हरी पेठे अ‍ॅंड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे
  • अशोक सापटे – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० गॅ्रम चांदीचे नाणे
  • अजिता कामत, ठाणे – लगुन गिफ्ट वाऊचर, २० गॅ्रम चांदीचे नाणे
  • स्वाती सायखेडकर, ठाणे – कलानिधीकडून पैठणी
  • मुग्धा केतकर, ठाणे – हेडफोन आणि रेमंड गिफ्ट वाऊचर
  • शीतल पुसळकर, ठाणे – वागाड्स आणि रेमंडचे गिफ्ट वाऊचर
  • श्रद्धा पवार, ठाणे – मॅक इलेक्ट्रोनिक्स आणि रेमंड गिफ्ट वाऊचर
  • अनुराधा पोळ – वामन हरी पेठे अ‍ॅंड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे
  • कविता शिर्के, कल्याण – इस्त्री
  • अमोघ गावंडे, कळवा – सुलोच गिफ्ट वाऊचर व २० गॅ्रम चांदीचे नाणे
  • ज्योती अधिकारी, डोंबिवली – लगुन आणि वागाड्सचे गिफ्ट वाऊचर
  • मनीषा जोशी, कल्याण – कलामंदीर आणि वागाड्सचे गिफ्ट वाऊचर
  • सौरभ कुलकणी – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० गॅ्रम चांदीचे नाणे
  • अर्चना माळवी, ठाणे –  इस्त्री

पितांबरीमधून काही सामान खरेदी केले होते. त्यांनी अर्जाबद्दल सांगितल्यावर सहज गंमत म्हणून अर्ज केला. दोन दिवसांनी लोकसत्ताच्या कार्यलयातून फोन आला आणि बक्षीस लागल्याचे सांगितले. खूप आनंद झाला आहे.

– जे.व्ही.प्रधान, १ ग्रॅम सोन्याचे नाणे

 

  • शॉपिंग फेस्टिव्हल’मधील विजेत्यांच्या प्रतिक्रिया

पितांबरीमधून काही सामान खरेदी केले होते. त्यांनी अर्जाबद्दल सांगितल्यावर सहज गंमत म्हणून अर्ज केला. दोन दिवसांनी लोकसत्ताच्या कार्यलयातून फोन आला आणि बक्षीस लागल्याचे सांगितले. खूप आनंद झाला आहे.

– जे.व्ही.प्रधान, १ ग्रॅम सोन्याचे नाणे

ही योजना ग्राहकांना खरेदी करण्यासाठी उत्साह देणारी आहे. अशा स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्यांदाच बक्षीस मिळाले . यापुढेही लोकसत्ताने अनेक स्पर्धा राबवाव्यात. अनपेक्षिच मिळालेले बक्षीस हे आनंद देऊन जाते. या बक्षिसामुळे शॉपिंगचा उत्साह वाढला आहे.

– अर्चना माळवी, विजेते

एस.ए. ईनामदारमध्ये किरकोळ खरेदी केली होती. त्या ठिकाणी ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिवल’चा अर्ज भरला.  किरकोळ बक्षीस मिळणार असेल असे गृहीत धरून बक्षीस घेण्यासाठी आले होते. मात्र येथे आल्यावर पैठणी मिळाली त्यामुळे जास्त आनंद आहे.

– स्वाती सायकेडकर, पैठणी

औपचारिकता म्हणून  भरलेल्या अर्जामधून अशा प्रकारे बक्षीस मिळेल असे वाटलेच नव्हते. ‘लोकसत्ता’मुळे मिळालेल्या बक्षीसासाठी भारावून गेलो असून केतकी माटेगावकर यांनी हे बक्षीस दिल्याचा विशेष आनंद झाला आहे.

-सौरभ कुलकर्णी, चांदीचे नाणे

 

  • विक्रेत्यांचे मत

लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालो होतो. असे असूनही ग्राहकांकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांमुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये खरेदी विक्रीसाठी उत्साह द्विगुणीत होतो. तसेच ग्राहकांची विश्वासार्हता वाढते. पुढील वर्षीही या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी दुकानाला दिलेली सदिच्छा भेट खुपच आवडली. या उपक्रमामुळे झेनाला खुप फायदा झाला आहे.

-अनिल पवार, झेना डिझाईन

लोकसत्ता शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभाग घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे. यामुळे ग्राहकांशी असलेले नाते अधिक घट्ट  होते. गर्दी असली तरी महिलावर्ग स्वत: लोकसत्ता शॉपींग फेस्टिव्हलसाठी लागणारे अर्जाची मागणी करत होत्या. अशा उपक्रमांसाठी महिलावर्ग अधिक ुत्साही असतो.

– सोनाली देवळेकर, सरलाज पार्लर

लोकसत्ता शॉपिंग फेस्टिवल योजनेमुळे दुकानामध्ये ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. शिवाय अशा योजनांमुळेच ग्राहक आणि विक्रेते यामध्ये चांगले नाते तयार होते. ग्राहकांच्या संख्येत कमीलीची वाढ झाली आहे. यामुळे लोकसत्ताने ग्राहक आणि विक्रेत्यांच्या हिताच्या असणाऱ्या योजना नेहमीच राबवाव्यात. तसेच अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी दुकानातून खरेदी केल्याचाही आनंद आहे. एखाद्या अभिनेत्रीने दुकानातून काही खरेदी करण्याचा पहिल्यांदाच योग जुळून आला.

– सिध्दार्थ सारंगी आणि दिपांकर बोस, सुलोच