‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन; येत्या ५, ६ जून रोजी ठाण्यात कार्यशाळा

ठाणे : कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखांपुरते मर्यादित असलेले करिअरचे जग आता प्रचंड विस्तारले आहे. याची जाणीव आजच्या तरुणाईला आणि पालकांनाही होत आहे. आजच्या तरुणाईकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत; पण पर्यायांच्या जंजाळातून आपल्याला योग्य असे नेमके करिअर कोणते, हा निर्णय घ्यायचा असेल तर ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेला भेट द्यायलाच हवी.

आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा येत्या ५ आणि ६ जूनला ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. त्यात करिअरच्या वेगवेगळय़ा पर्यायांबाबत तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. शिवाय वेबविश्व, टीव्ही पत्रकारिता, संवादलेखन यासारख्या क्षेत्रांतील करिअर संधींबाबतही ते माहिती देतील. करिअर समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञही विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास उपस्थित राहणार आहेत.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी ‘करिअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, तर वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. सागर मुंदडा आणि डॉ. अमोल अन्नदाते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विधि शिक्षणाविषयी प्रा. नारायण राजाध्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. ‘भाडिपा’ अर्थात भारतीय डिजिटल पार्टीचे सारंग साठय़े हे वेबविश्वातील करिअरविषयी बोलतील, तर संवाद-पटकथा लेखन या विषयावर सचिन दरेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. ‘एबीपी माझा’च्या पत्रकार ज्ञानदा कदम टीव्ही पत्रकारितेच्या ग्लॅमरमागची मेहनत उलगडून सांगतील. याचसोबत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या सर्व तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. सोबतच आपल्या मनातील प्रश्न आणि शंकांचे समाधानही या तज्ज्ञांशी थेट संवाद साधून करता येईल.

कधी?

५ व ६ जून

कुठे?

टिपटॉप प्लाझा, ठाणे</p>

लक्षात ठेवा

* या कार्यशाळेसाठी प्रत्येकी ५० रु. शुल्क भरून नोंदणी करावी लागेल.

* खालील ठिकाणी स. १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात प्रवेशिका मिळू शकतील.

– जिन्स जंक्शन, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)

-टिपटॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड चेक नाक्याजवळ, ठाणे

– लोकसत्ता कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेवर, नवजीवन रक्तपेढीच्या शेजारी, नौपाडा, ठाणे (प.)

*  त्याचबरोबर पुढील लिंकवरूनही विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. http://tiny.cc/margyashacha2019thane

प्रायोजक

या कार्यशाळेचे ‘टायटल स्पॉन्सर’ ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ हे असून सहप्रायोजक ‘विद्यालंकार क्लासेस’ आहेत. एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन ओव्हरसीज, सासमिरा, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, युक्ती हे ‘पॉवर्डबाय पार्टनर’ असून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग पार्टनर आहे.