दिवाळीच्या सुट्टीची मजा द्विगुणीत करण्यासाठी शिवसेना स्वातंत्र्यवीर साव्नकर नगर यांच्या वतीने ‘कोकण महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे आठवे वर्ष असून विविध नामांकित नाटक मंडळींचे ‘दशावतारी’ प्रयोगासह सागोती, सुके बांगडे, सर्व प्रकारची मासळी, सरंगो, इसवन, पेडवे, मोरी, सुके पापलेट यांबरोबरच मालवणी खाज्या, कुरमुरे लाडू, खडखडे लाडू, उडीद, कुळथाची पिठी, कोकम रस  सुकी मच्छी, कोकणातील विविध मसाले, सोबत कोकणातील विविध शाकाहारी व मांसाहारी रुचकर खाद्य पदार्थाची मेजवाणी ठाणेकरांना या महोत्सवामध्ये मिळणार आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता देव माऊली दशावतार नाटय़ मंडळ यांचे ‘राजा चंद्रागत’ ,रविवार, १५ नोव्हेंबर रोजी वालावलकर दशावतार नाटय़ मंडळाचे ‘चिंतामणी जन्म’, सोमवार, १६ नोव्हेंबर मालवणी विनोदी नाटक ‘हा खेळ संचितांचा’ , मंगळवार, १७ नोव्हेंबर कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळ, ‘दैव योग’, बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी ‘राजा सतसेन’, गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी ‘वेडा अंगद’ , शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी ‘विधिलिखित’ आणि शनिवार, महिलांसाठी पैठणींचा खेळ व ‘पुण्यप्रभाव’ आदी कार्यक्रम या महोत्सवामध्ये सादर होणार आहेत. तसेच कोकणातील पारंपरिक खेळांबरोबर खेळ पैठणीचा, किल्ले स्पर्धा, परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.
’कधी- १४ ते २१ नोव्हेंबर, सायंकाळी ७ ते रात्री १०.३०
’कुठे- सावरकर नगर, ठाणे(प.)

फराळाच्या खादाडीवर पौष्टिक उताराह्ण
दिवाळीच्या फराळामध्ये भरमसाट तेल, तूप आदी पदार्थाचा वापर केला जातो. त्यामुळे काही प्रमाणात आपल्या शरीरावर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून कोरम मॉलतर्फे दिवाळीसाठी काही पौष्टिक खाद्य पदार्थ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कोरम मॉलच्या वुमन्स ऑन वेनस्डे या उपक्रमाअंतर्गत येत्या बुधवारी दुपारी तीन ते रात्री आठ यावेळेत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी आणि काकडीपासून तयार केलेला अर्क, बीट आणि केळी यांपासून तयार केलेले स्मुथी(घट्ट मिश्रण), आलं आणि लिंबूचा रस यांसारख्या विविध पौष्ठिक रेसिपींचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.
’कधी- बुधवार, १८ नोव्हेंबर, वेळ- दुपारी ३ ते रात्री ८
’कुठे- कोरम मॉल, मंगल पाण्डे रोड, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे (प.)

former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
sindhudurg district collector ordered deepak kesarkar s to deposit pistols
केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?