News Flash

भूमाफियांना वसई विरार महापालिकेचा दणका

वसई विरार शहरातील भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

नालासोपारा येथील ३८ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे जमिनदोस्त

वसई : वसई विरार मधील भूमाफियांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात वसई विरार महापालिकेने पुन्हा एकदा मोहीम उघडली आहे. गुरूवारी पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समिती ‘ई’ ने नालासोपारा पूर्वेच्या सोपारा येथील उमर कंपाऊंड येथे कारवाई करून सुमारे ३८ हजार चौरस फुटांवरील बेकायदेशीर बांधकामे जमिनदोस्त केली. यामध्ये प्रामुख्याने वाणिज्य गोदामे, व्यावसायिक गाळे आदींचा समावेश होता.

वसई विरार शहरातील भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे. शहरातील जवळपास १ कोटी चौरस मीटर क्षेत्रफळावर अनिधिकृत बांधकामे झालेली आहेत. करोनाच्या काळातही मोठ्या प्रमाणवर ही बांधकामे सुरू होती. याविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. गुरूवारी प्रभाग समिती ‘ई’चे प्रभारी साहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त प्रेमसिंह जाधव, उपायुक्त किशोर गवस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस बंदोबस्तात नालासोपारा पुर्वेच्या सोपारा फाटा, पेल्हार आणि उमर कंपाऊड येथे ही कारवाई केली. भूमापन क्रमांक (सर्वे नंबर ९२) येथे सुशील आव्हाड, अर्शद चौधरी, सैजाद खान, आदी भूमाफियांनी केलेले सुमारे ३८ हजार चौरस फुटांचे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले.

या कारवाईत पोकलन मशिन, जेसीबीच्या साहाय्याने मोठ मोठी वाणिज्य गोदामे तोडण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कारवाईत मोठी गोदामे, व्यावसायिक गाळे, पत्र्याची शेड तोडण्यात आली. बांधकामासाठी रचलेला पाया तोडण्यात आला. त्यामुळे भूमाफियांची दाणादाण उडाली.

कारवाईच सुरूच राहणार

वसई-विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहिल, असे अतिक्रमण विरोधी विभागाचे  प्रेमसिंह जाधव  यांनी सांगितेल. तर एका दिवसात झालेली ही मोठी कारवाई आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही ही कारवाई केली, असल्याचे प्रभाग समिती ‘ई’ प्रभारी साहाय्यक मोहन संख्ये यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:07 am

Web Title: land mafiatheft hit by vasai virar municipal corporation akp 94
Next Stories
1 शाळा बंद असल्याचा आदेश डावलल्याने १३ शाळांवर गुन्हा दाखल
2 शहरातील शाळांचा ऑनलाइन शिक्षणावर भर
3 अंतरसोवळ्याचे नियम पाळा, अन्यथा दंड भरा!
Just Now!
X