01 March 2021

News Flash

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात टीम ओमीचे शक्तिप्रदर्शन

उल्हासनगर महापालिकेच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने टीम ओमी कलानीला जवळ केले.

कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, करोना नियम पायदळी

उल्हासनगर : महापालिका निवडणुकांना  नजिक असतानाच टीम ओमी कलानीने पुन्हा एकदा राजकीय प्रचाराला सुरुवात केली आहे. बुधवारी माजी आमदार ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प पाच भागातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या भाटिया चौक परिसरात टीम ओमी कलानीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी खुद्द ज्योती कलानी, ओमी कलानी आणि पंचम कलानी उपस्थित होत्या. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस विरोध हे कलानी गटाचे धोरण असल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने टीम ओमी कलानीला जवळ केले. महापौरपद भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका आणि ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी महापौरपदी विराजमान झाल्या. मात्र पायउतार होण्याची वेळ येताच विधानसभेच्या तिकिटावरून कलानी गटाने  बंडखोरी करत शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मत दिले. त्यामुळे भाजपची हातची सत्ता गेली. मात्र भाजपने तिकीट नाकारल्याने भाजपशी कलानी गटाने फारकत घेतली. कालांतराने ज्योती कलानी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध तोडले. आता पालिका निवडणुका जवळ आल्याने टीम ओमी कलानीने पुन्हा राजकीय वजन वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टीम ओमी कलानीने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कॅम्प पाच भागातील भाटिया चौक परिसरात बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र बहुतांश व्यक्तींनी मुखपट्टी लावलेली नव्हती. शेकडो जणांनी करोनाचे नियम पायदळी तुडविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:18 am

Web Title: large crowd of activists corona rule foot akp 94
Next Stories
1 पापडखिंड धरणातून पाणी बंद
2 नागरिकांच्या संतापापुढे अधिकाऱ्यांचे नमते
3 रेल्वे प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन
Just Now!
X