News Flash

मीरा-भाईंदरमध्ये टाळेबंदीचा फज्जा

मोठय़ा प्रमाणात नागरिकांची रस्त्यावर रहदारी

मोठय़ा प्रमाणात नागरिकांची रस्त्यावर रहदारी

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्याकरिता प्रशासनाकडून पूर्णत: टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु तरी देखील अनेक नागरिक प्रशासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे  परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. रविवारी समोर आलेल्या अहवालानुसार एकूण ५ हजार ५६८ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. तर आता पर्यंत १९१ रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. शहरातील रुग्णवाढीचा वेग प्रति दिवस १५० ते १६० इतका वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत करण्यात आलेल्या टाळेबंदी नियमात वाढ करून १८ जुलैपर्यंत टाळेबंदी नियम कायम ठेवण्यात आला आहे. यात केवळ अत्यावश्यक कामांना वगळून इतर कामाकरिता बाहेर पाडण्यास बंदी असताना देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करत आहेत.

रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याकरिता पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचे सातत्याने आवाहन करत आहेत. त्याकरिता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. तरी देखील भाईंदर पूर्व आणि पश्चिम परिसरात त्याचप्रमाणे मीरा रोड येथील बाधित काही भागात नागरिक आंतर नियमांचे पालन न करता घराबाहेर निघत आहेत.

यात फेरफटका आणि बाजार घेण्याकरिता निघालेल्या नागरिकांनाचे प्रमाण अधिक आहे. विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत असले तरी नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसल्याचे प्रकट होत आहे.

टाळेबंदी नियमाला विरोध

परस्पर निर्णय घेऊन आयुक्तांनी टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप महापौरांसह अनेक लोकप्रतिनिधींनी केला आहे. गेल्या १०० दिवसांपासून करोनामुळे अनेक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती  बिकट झाली आहे. तसेच पूर्वी देखील  टाळेबंदी करून देखील काही साध्य न झाल्यामुळे पुन्हा टाळेबंदीसारखा निर्णय का घेण्यात येतो, असा प्रश्न विचारला जात आहे.

छुप्या पद्धतीने दुकाने सुरू

१८ जुलेपर्यंत करण्यात आलेल्या टाळेबंदीत केवळ औषध विक्रे त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु छुप्या पद्धतीने इतर दुकाने देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सामानाच्या खरेदीकरिता नागरिक सातत्याने रस्त्यावर उतरत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:11 am

Web Title: large number of people on the road in mira bhayandar during lockdown zws 70
Next Stories
1 वसईत दूषित पाण्याचे संकट
2 हॉटेलांतील अलगीकरणाचा निर्णय रद्द
3 ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करोनाच्या कचाटय़ात
Just Now!
X