19 September 2020

News Flash

तीन हात नाक्याचे तीनतेरा!

उड्डाणपूल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे; उंचसखल मार्गामुळे वाहनांची संथगती

उड्डाणपूल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे; उंचसखल मार्गामुळे वाहनांची संथगती

ठाणे : ठाण्यातील तीन हात नाका उड्डाण पुलावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने सकाळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी या उड्डाण पुलावर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तीन हात नाका ते मुलुंड टोलनाका या पाच मिनीटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास घालवावा लागत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी तीन हात नाका उड्डाणपूल हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली भागात राहणारे आणि कामानिमित्ताने मुंबई—नवी मुंबई जाणारे खासगी कंपन्यांतील कर्मचारी त्यांची वाहने घेऊन दररोज या मार्गावरून ये—जा करत आहेत. घोडबंदर, शिळफाटा आणि भिवंडीतील वाहतूक कोंडी, खड्डे यामधून वाट काढत आलेल्या वाहन चालकांना आता तीन हात नाका येथील उड्डाणपूलावर पडलेल्या खड्डय़ांमुळे पुन्हा एकदा अडकून राहावे लागत आहे. या खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने दररोज सकाळी उड्डाणपूल आणि खालील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या लागत आहेत. तीन हात नाका ते मुलुंड टोलनाका या अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास घालवावा लागत आहे. येथील वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांनाही त्रासदायक ठरत आहे. मुंबईहून घरी येतानाही खड्डय़ामुळे वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:47 am

Web Title: large number of potholes on thane teen hath naka flyover zws 70
Next Stories
1 इंटरनेट बंद असल्याने टपाल कार्यालयांची कामे ठप्प
2 उल्हासनगर महापालिकेचा फुगवटय़ाचा अर्थसंकल्प
3 भिवंडीत सोनसाखळीसाठी मित्राची हत्या
Just Now!
X