13 August 2020

News Flash

मीरा-भाईंदरमध्ये करोनाच्या मृत्यूत ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी

मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधितांच्या संख्येच्या दुपटीचा वेग कमी होऊन २८ दिवसांवर गेला आहे.

संग्रहित छायाचित्र

मृत्यूचा दर चार टक्के

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृतांची संख्यादेखील वाढत आहे. आतापर्यंत शहरातील  मृत्यूचा दर ४ टक्के असला तरी दररोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे यातदेखील वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून दररोज सरासरी चारपेक्षा अधिक मृत्यूची नोंद होत आहे. विशेष म्हणजे एकूण मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे.

मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधितांच्या संख्येच्या दुपटीचा वेग कमी होऊन २८ दिवसांवर गेला आहे. तर मृत्युदरातील टक्केवारीचे प्रमाण वर-खाली होत असले तरी दररोज होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातही ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा करोनाने बळी जात आहे. २९ जूनपर्यंत मीरा-भाईंदरमध्ये १४२ करोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी मृत्यू झालेल्यांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्ण अधिक आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये एकूण करोनाबाधितांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यापैकी २,२११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर ८१२ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाधितांमध्येही ३० ते ६० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. कामानिमित्त बाहेर जाणारा, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारा हा वयोगट आहे. त्यामुळे साहजिकच या वयोगटात संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असून महिलांचे प्रमाण कमी आहे. एकूण मृतांमध्ये ५० ते ७० या वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे.

मृत्यूचे प्रमाण

वय    मृतांची संख्या

० ते १०       ०

१० ते २०     ०

२० ते ३०     ०

३० ते ४०      ९

४० ते ५०      १९

५० ते ६०      ३०

६० ते ७०      २५

७० ते ८०      २०

८० ते ९०     ०३

९० ते १००     ०१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:14 am

Web Title: large number of senior citizens were dead due to coronavirus in mira bhayandar zws 70
Next Stories
1 करोनाकेंद्रातील रुग्णांचे हाल
2 टाळेबंदीमुळे रानमेव्यापाठोपाठ रानभाज्यांवरही संक्रांत
3 सुशोभीकरणाच्या कामामुळे कोंडीची समस्या
Just Now!
X