21 September 2020

News Flash

गुजरातच्या गुटख्याचा ठाण्याला फास

राज्यात गुटखा विक्री करण्यावर राज्य शासनाने बंदी घातली आहे.

संग्रहित छायाचित्र

ठाणे : राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातली असताना करोनाकाळात गुजरातमधील वेगवेगळ्या भागांतून ठाणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. अन्न आणि औषध विभागाने गेल्या दोन महिन्यांत दहा ठिकाणी कारवाई करून अडीच कोटींचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यामध्ये भिवंडीत सर्वाधिक आठ ठिकाणी कारवाई झाली आहे.

राज्यात गुटखा विक्री करण्यावर राज्य शासनाने बंदी घातली आहे. तरीही शहरातील अनेक ठिकाणी रोजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पान टपरी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. असे असतानाही ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये बेकायदा पद्धतीने सिगारेट तसेच पानमसाल्याची विक्री होत असून यामध्ये गुटखा विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. अन्न व औषध प्रशासन, ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत गेल्या दोन महिन्यांत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. त्यापैकी पोलिसांनी ७१ लाख रुपयांचा तर अन्न व औषध प्रशासनाने दीड कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.  गुजरातमध्ये पानमसाला तसेच गुटखा विक्रीला बंदी नाही. त्यामुळे तिथून हा साठा जिल्ह्य़ात येत असल्याचा संशय असून याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अशी होते गुटखा विक्री

टाळेबंदीपूर्वीच अनेक टपरीचालकांनी त्यांचे मोबाइल क्रमांक ग्राहकांना दिले आहेत. त्यावर किंवा व्हॉटस्अ‍ॅपवर संपर्क साधून ग्राहक गुटख्याची मागणी करतात. त्यानुसार टपरीचालक त्यांच्या घरी गुटखा पोहोचवितात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:13 am

Web Title: large quantity of gutkha transported to thane district from gujarat zws 70
Next Stories
1 कोंडीच्या प्रवासामुळे खिशालाही फोडणी
2 जुन्या डोंबिवलीत करोनाचा प्रादुर्भाव
3 उपजिल्हा रुग्णालयाला लालफितीची बाधा
Just Now!
X