01 March 2021

News Flash

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात बिबट्याचा मृत्यू; मदतीऐवजी लोक काढत होते फोटो

दुर्वेश गावातील घटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघऱमधील दुर्वेश गावच्या परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे . बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत बिबट्याच्या शेजारी बसून फोटो काढत होते.

गेल्या वर्षभरामध्ये अशाच प्रकारे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे आतापर्यंत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने बऱ्याच ठिकाणी घनदाट जंगल आहे. येथे रात्रीच्या वेळी बिबटे भक्ष्याच्या शोधात महामार्गावर येतात. अनेकदा अंधारात प्राणी न दिसल्याने वाहनांच्या धडकेत त्यांचा मृत्यू होतो.

महामार्गाच्या ज्या भागात घनदाट जंगल आहे व वन्यप्राणी रस्त्यावर येऊ शकतात अशा ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला संरक्षक जाळ्या वनविभागाने बसवाव्यात जेणेकरुन अशाप्रकारे दुर्मिळ वन्यजीवांचा मृत्यू होणार नाही अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 10:22 am

Web Title: leopard dead in accident in palghar sgy 87
Next Stories
1 ‘धूम स्टाईल बायकर्स’वर होणार कारवाई; पोलिसांनी हाती घेतली मोहीम
2 ठाण्यात शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये वाद
3 यशोधननगर, सावरकरनगर परिसरात बत्ती गुल
Just Now!
X