भाजप आणि शिवसेना यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळे अटीतटीच्या झालेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शिवसेना- भाजप आणि काही अंशी काँग्रेसमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा सपशेल फोल ठरली. मिरा-भाईंदर महापालिकेच्या मागील निवडणुकीत अवघ्या २९ जागा जिंकणाऱ्या भाजपने या निवडणुकीत तब्बल दुप्पट जागा जिंकत शिवसेना आणि काँग्रेसच्या मनसुब्यांना लगाम घातला.  मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण ९५ जागांपैकी ६१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. पालिकेत सत्तास्थापनेसाठी ४८ जागांची गरज होती. मात्र, भाजपने पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच हा आकडा ओलांडला होता. तर दुसरीकडे भाजपला ‘काँटे की टक्कर’ देण्याची रणनीती आखलेल्या शिवसेनेला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपसोबत युती करुनही शिवसेनेला १४ जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा स्वबळावर लढूनही २२ जागांवर विजय मिळणे, ही शिवसेनेसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. तर देशपातळीवर घरघर लागलेल्या काँग्रेसची या निवडणुकीतही काही प्रमाणात पिछेहाट झाली आहे. भाजपच्या झंझावातामुळे अगदी अखेरच्या सत्रापर्यंत शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या १०च्या वर जाईल किंवा नाही, याबद्दल शंका वाटत होती. परंतु अखेरच्या सत्रात दोन्ही पक्षांनी काही प्रमाणात ही पिछाडी भरून काढली. मात्र, काँग्रेसला दहा जागांपर्यंतच मजल मारता आली. उर्वरित एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. तर मनसे आणि बहुजन विकास आघाडीचा या निवडणुकीत पुरता फज्जा उडाला. निकालाच्या कुठल्याच टप्प्यावर या दोन्ही पक्षांचे अस्तित्त्व दिसून आले नाही.

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची निष्क्रियता भाजपच्या चांगलीच पथ्यावर पडली. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या ठिकाणी भाजप पाठोपाठ २७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व जागांवर उमेदवारही उभे करता आले नव्हते. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. भाजपने याचा पुरेपूर फायदा उचलत पालिकेतील आपले संख्याबळ तब्बल तिपटीने वाढवले.

who is st somashekar
राज्यसभा निवडणूक २०२४ : कर्नाटकमध्ये भाजपाच्या दोन आमदारांच्या मदतीमुळे काँग्रेसचा विजय? क्रॉस व्होटिंग करणारे आमदार आहेत तरी कोण?
karnataka
कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे? भाजपाने शेअर केला VIDEO
Arvind Kejriwal expressed fear of arrest
केजरीवाल यांना अटक होण्याची भीती व्यक्त
Karnataka Jds bjp member in rajyasabha
Rajyasabha Election : कर्नाटकात कुपेंद्र रेड्डी निवडणूक रिंगणात; क्रॉस व्होटिंगची शक्यता; काँग्रेसपुढे मोठे आव्हान

भाजपचे ‘शत प्रतिशत धोरण’, त्या दृष्टीने राबवण्यात आलेली आक्रमक रणनीती, भाजपशी सतत दोन हात करण्याच्या तयारीत असलेली शिवसेना आणि अमराठी उमेदवारांना उभे करण्याची काँग्रेसची खेळी या घटकांमुळे यंदाची निवडणूक कधी नव्हे इतकी रंगतदार बनली होती. ‘संसद ते पंचायत तक’ एकहाती सत्ता मिळवण्याच्या धोरणानुसार भाजपने या निवडणुकीतही स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते. तर आपले प्रादेशिक वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेनेनेही या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेऊन केलेला प्रचार पाहता मिरा-भाईंदर महानगरपालिका दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेची होती, हे दिसून आले होते . अखेर या प्रतिष्ठेच्या लढाईत बाजी मारत भाजपने राज्यात आपणच एक नंबर असल्याचे दाखवून दिले.

ठळक घडामोडी:

*  राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव, एकही उमेदवार निवडून आणण्यात अपयश
*  मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता; शिवसेना आणि काँग्रेसला लगाम घालण्यात यश
*  मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपचा दणदणीत विजय; ९५ पैकी ६१ जागांवर यश

*  मतमोजणी संपन्न; सर्व ९५ जागांचे निकाल जाहीर
*  १ वाजेपर्यंत जाहीर झालेले निकाल- भाजप – २८, काँग्रेस – ३, शिवसेना – ५, अपक्ष – १
*  भाजप – १९, शिवसेना – ४ , काँग्रेस – ६ जागांवर आघाडी
*  शिवसेनेला फक्त पाच जागांवर विजय; अन्य पाच जागांवर आघाडी
*  विजयी उमेदवारांचा दुहेरी आकडा गाठतानाच शिवसेना आणि काँग्रेसची दमछाक
*  ९५ पैकी २४ जागांवर भाजप विजयी, २३ जागांवर आघाडी
*  प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप पॅनलचे चारही उमेदवार विजयी; अ. अशोक तिवारी, ब. पंकज पांडे, क. रिटा शहा, ड. सुनीता भोईर यांचा विजय
*  प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेचे पॅनल विजयी; अ. जयंतीलाल पाटील, ब. तारा घरत, क. स्नेहा पांडे, ड. हरिश्चंद्र आमगवकर यांचा विजय
*  भाजपची वेगात घोडदौड; तब्बल ३८ जागांवर आघाडी
* भाजप – १५, काँग्रेस – २, शिवसेना – १ आणि अन्य १
* भाजपची विजयी घोडदौड, प्रभाग १२, १४ आणि १७ मधील पॅनेलवर भाजप विजयी
* सुरुवातीच्या सत्रात भाजपची जोरादार घौडदौड; शिवसेना आणि काँग्रेस पिछाडीवर
* प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय; अ. प्रीती पाटील, ब. डिंपल मेहता, क. अरविंद शेट्टी, ड. हसमुख गेहलोत यांचा विजय
* प्रभाग ९ मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी
* सकाळी साडे अकरापर्यंतच्या कलानुसार भाजप २०, शिवसेना ०२, काँग्रेस ०५ जागांवर आघाडी
* प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजप पॅनलचे चारही उमेदवार विजयी
* प्रभाग क्रमांक ८ अ मधून शिवसेनेच्या कॅथलिन परेरा विजयी, कॅथलिन परेरा या माजी महापौर गिल्बर्ट मेंडेसा यांची मुलगी
* भाजप २२ आणि शिवसेनेची १० जागांवर आघाडी

*  दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
*  सुरूवातीच्या टप्प्यात टपालद्वारे करण्यात आलेल्या मतांची मोजणी
*  मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
*  शिवसेना उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे प्रभाग क्रमांक २२ (अ) मधील काँग्रेस उमेदवार उमा सपार बिनविरोध विजयी
* आज सकाळी दहा वाजता होणार मतमोजणीला सुरुवात.