News Flash

ठाण्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन जाहीर

ठाण्यात ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन वाढवला

संग्रहित छायाचित्र

करोनामुळे निर्माण झालेलं संकट अद्यापही टळलेलं नसल्याने तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाण्यात ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेकडून हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असेल असं जाहीर करण्यात आलं आहे. यासंबंधी महापालिकेकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये याआधी जाहीर करण्यात आलेले निर्बंध कायम असणार आहेत.

आदेशात देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहील. यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स, जीम व स्विमिंग पूल वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने पी-१ आणि पी-२ तत्त्वावर चालवण्यास परवानगी आहे.

यानुसार रस्त्याच्या एका बाजूला दुकाने, लेन, पॅसेज इत्यादी सम तारखांना उघडले जावेत. तर दुसऱ्या बाजूची दुकानं विषम तारखेला उघडली जावीत. ही दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 9:28 pm

Web Title: lockdown announced till 31st august in hotspot areas of thane sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मनसे नेते अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस, संताप व्यक्त करत म्हणाले, “कोणतंही आंदोलन मी ….”
2 पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार ?
3 अतिसंक्रमित क्षेत्रे घटणार?
Just Now!
X