News Flash

ठाण्यातल्या हॉटस्पॉटमध्येच लॉकडाउन, इतर भागांमध्ये मिशन बिगिन अगेन!

महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाण्यात करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणीच पूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. इतर ठिकाणी राज्य सराकारच्या आदेशाप्रमाणे मिशन बिगिन अगेन अंतर्गत नियम लागू करण्यात आल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले आहेत. उद्या शहरातले लॉकडाउन संपणार होते. मात्र आता हॉटस्पॉट वगळता ठाण्यात इतर ठिकाणी मिशन बिगिन अगेनचे नियम लागू करण्यात आले आहेत.

ठाणे महापालिका आयुक्तांनी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता. हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये लॉकडाउन वाढविण्याची आवश्यकता आहे असं महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. हॉटस्पॉट वगळता इतर भागांमध्ये मिशन बिगिन अगेनचे नियम लागू केले जातील. त्याचप्रमाणे हॉटस्पॉटमधला लॉकडाउन हा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे असंही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

हॉटस्पॉट क्षेत्रांव्यतिरिक्त संपूर्ण शहरात राज्य शासनाने २९ जून २०२० रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहिल. यामध्ये मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटस, बाजारपेठ आणि दुकाने P1 व P2 तत्त्वावर चालवण्यास संमती असेल. रस्त्याच्या एका बाजूला दुकाने, लेन, पॅसेज आदी समतारखांना आणि दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखांना उघडली जावीत. या दुकानांची वेळ सकाळी ९ ते ५ अशी असली पाहिजे असंही आयुक्तांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 9:32 pm

Web Title: lockdown in thane hotspot mission begin again in other parts says thane municipal commissioner scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीची मुदत वाढविण्यास विरोध
2 टाळेबंदीमुळे आषाढ समाप्तीवर विरजण
3 मीरा रोड येथे १२ वर्षांच्या मुलीचा खेळताना गळफास लागल्याने मृत्यू
Just Now!
X