‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या वार्षिक विशेषांक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा गुरुवारी मोठय़ा उत्साहात ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे झाली. या स्पर्धेत १२०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांनी नारळापासून तयार केलेली कॉफी, सँडविच, बालुशाही, केक, खांडवी आणि केरवळ्या यांसारखे विविध पदार्थ स्पर्धेसाठी बनवून आणून ते आकर्षकरीत्या सादर केले होते. या स्पर्धेचे परीक्षण अर्चना आर्ते, राधा जोगळेकर आणि चारुशीला धर यांनी केले.

नऊ राज्यांतील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी एकेका राज्यातील महत्त्वाच्या पदार्थाचा परिचय ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांकात करून दिला आहे. गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील खाद्यसंस्कृतीची माहिती या विशेषांकात देण्यात आली आहे. ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या सहाव्या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी पाककृती स्पर्धाही जल्लोषात पार पडली. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मुलुंड, वसई, घाटकोपर, विक्रोळी, नालासोपारा या भागांतील नागिरिकांनी उत्स्फूर्तपणे या पाककृती स्पर्धेत सहभाग घेऊन आपली पाककला सादर केली.

d. gukesh
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेशची विदितवर मात
Candidates Chess Tournament Alireza Firuza defeats D Gukesh sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

या स्पर्धेत नारळाचा कोणताही एक गोड पदार्थ घरी बनवून आणून सादर करायचा होता. स्पर्धकांनी केवळ पदार्थ बनवूनच आणले नव्हते तर बनवून आणलेल्या खाद्यपदार्थाची मांडणीही हटके पद्धतीने केली होती. नारळापासून तयार केलेली रबडी, खोबरे घालून केलेले पुढाचे घावणे, खोबऱ्यासह फळांचा वापर करून तयार केलेले सॅण्डविच, खोबऱ्याचा वापर करून पालक आणि बीटाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या नारळ्याच्या वडय़ा, खोबरे आणि चीजचा वापर करून तयार करण्यात आलेला केक, खोबऱ्याची पोळी, राजाई केळींमध्ये नारळाचे सारण घालून तयार केलेल्या केरवळ्या, खोबऱ्याचा वापर करून त्यात चिंच घालून तयार केलेल्या कॅन्डी, नारळामधील मलईचा वापर करून तयार केलेले पुडिंग, नारळाच्या वडय़ा आणि मोदक यांसारखे विविध पदार्थ या वेळी स्पर्धकांनी सादर केले.

खोबरे, चॉकलेट, व्हॅनिला, गुळाचा पाक आणि शेवया यांचा वापर करून नारळाच्या आकाराचा एक खाण्याजोगा पदार्थही या स्पर्धेवेळी सादर करण्यात आला. १६ वर्षांपासून ते ७० वर्षांच्या महिलांनी या पाककृती स्पर्धेत सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील विजेते

* प्रथम क्रमांक- यामिनी कुंडेटकर

* द्वितीय क्रमांक- कल्पना गडकरी

* तृतीय क्रमांक- संगीता पिंगळे

* उत्तेजनार्थ- मृदुला दिघे

* उत्तेजनार्थ- अमिता देसाई

* उत्तेजनार्थ- आरती साठय़े

* उत्तेजनार्थ- नीला घारे

* उत्तेजनार्थ- वैष्णवी दीक्षित

प्रायोजक

प्रायोजक तन्वी हर्बल, सहप्रायोजक श्री धूतपापेश्वर, बँकिंग पार्टनर अपना बँक, पॉवर्ड बाय किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंदकुमार जीवन मार्गदर्शन, हेल्थकेअर पार्टनर होरायझन प्राइम हॉस्पिटल.