19 October 2019

News Flash

नववर्षांत गुंतवणुकीचा नवसंकल्प!

‘लोकसत्ता अर्थभान’ मालिकेत आगामी कार्यक्रम येत्या रविवारी बदलापूरकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे. 

रविवारी बदलापूरमध्ये ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रम

मुंबई : कुटुंबासाठी पाहिलेली स्वप्ने साकारता यावीत यासाठी गाठीशी पैसा असावा असे सर्वानाच वाटते, मात्र पैशाने पैसा कसा वाढवावा, गुंतवणुकीच्या उत्तम पद्धती कोणत्या, योग्य पर्यायांची निवड कशी करावी, याची माहिती नसते. या पाश्र्वभूमीवर गुंतवणुकीचा योग्य पर्याय आणि योग्य वेळ याचे मार्गदर्शन करणारा ‘लोकसत्ता अर्थभान’ मालिकेत आगामी कार्यक्रम येत्या रविवारी बदलापूरकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकविषयक जनजागराचा ‘लोकसत्ता अर्थभान’ हा कार्यक्रम, रविवार, १३ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, कुळगाव, बदलापूर (पूर्व) येथे होणार आहे. २०१९ हे वर्ष गुंतवणूकदृष्टय़ा फलदायी ठरावे, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात, सध्याच्या काळातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक प्रकार असलेल्या म्युच्युअल फंडासंबंधी आर्थिक नियोजनकार सुयोग काळे मार्गदर्शन करतील. भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंड यांचा संबंध विशद करताना फंडांचे प्रकार, त्यातील गुंतवणूक आणि परतावा तसेच करबचतीचे मार्ग यावरही ते प्रकाश टाकतील.

बचत आणि गुंतवणूक ही दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया असून, जीवनाच्या विविध टप्प्यांवरील वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्यया गुंतवणूकमार्गाचे नियोजन प्रत्येकालाच आवश्यक आहे. या संदर्भातील उहापोह वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयातून करतील.

या वेळी उपस्थितांच्या गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन तज्ज्ञ करतील. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

 

कधी

रविवार, १३ जानेवारी २०१८

सकाळी १०.३० वाजता

कुठे

काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, कुळगाव, बदलापूर (पूर्व)

वक्ते :

कौस्तुभ जोशी :

अर्थनियोजनाचा श्रीगणेशा

सुयोग काळे

म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणूक

(Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully)

First Published on January 9, 2019 1:09 am

Web Title: loksatta arthbhaan event on sunday at badlapur