News Flash

‘असणं-नसणं’ ठाण्यातून प्रथम

‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय अंतिम फेरीस नाटय़प्रेमींचा उदंड प्रतिसाद

‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय अंतिम फेरीस नाटय़प्रेमींचा उदंड प्रतिसाद

‘लोकसत्ता लोकांकिका’ ठाणे विभागीय अंतिम स्पर्धेत गुरुवारी पाच महाविद्यालयांनी आपले सर्वोत्तम सादरीकरण केले.  या स्पर्धेत ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘असणं-नसणं’ एकांकिकेने सवरेत्कृष्ट लोकांकिकेचा मान पटकावत महाअंतिम फेरीत ठाणे विभागातून प्रवेश केला. या स्पर्धेत विरारच्या विवा महाविद्यालयाच्या ‘दिल-ए-नादान’ लोकांकिकेने द्वितीय, तर एमकॉस्ट महाविद्यालयाच्या ‘मजार’ या लोकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक शफाअत खान आणि सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. ठाणेकर महाविद्यालयीन तरुण आणि कलावंतांच्या भरघोस प्रतिसादात ही स्पर्धा रंगत गेली.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि केसरी क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे व झी युवा यांच्या सहकार्याने लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी ठाण्यात पार पडली. आयरिस प्रॉडक्शन हे स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर असून अस्तित्व या संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेला ठाण्यातील महाविद्यालयांनी भरघोस प्रतिसाद दिला. विरारच्या विवा महाविद्यालयाने ‘दिल-ए-नादान’   एकांकिकेचे सादरीकरण केले. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाने ‘हंगर आर्टिस्ट’ ही एकांकिका सादर केली.  सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने ‘रात्रीस खेळ चाले’  लोकांकिका सादर केली.  ठाण्याच्या एमकॉस्ट महाविद्यालयाने ‘मजार’ही  एकांकिका सादर केली.  सवरेत्कृष्ट एकांकिका ठरलेल्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘असणं-नसणं’ने पुरुषी मानसिकतेचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन घडवले.

सर्वच एकांकिका उत्कृष्ट होत्या. लोकसत्ताने तरुण रंगकर्मीना लोकांकिका स्पर्धेद्वारे चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. स्पर्धा करत राहा, अनुभवातून शिका, त्यातून व्यावसायिक रंगभूमीकडची तुमची वाटचाल अधिक सोपी होईल.  – अरुण नलावडे, परीक्षक

 

‘लोकसत्ता लोकांकिकेतून’ वेगवेगळे विषय हाताळले गेले. नवे विषय वेगळ्या दृष्टिकोनांतून मांडण्यात आले. पूर्वतयारीनिशी विषयाला भिडल्याचे जाणवले. मात्र चटपटीतपणापलीकडे जाण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. तांत्रिक वापर मर्यादित असला तरी त्यामध्ये सर्जनशीलता हवी. नेपथ्य आणि प्रकाश योजनेमध्ये कल्पकता असायला हवी. – शफाअत खान, परीक्षक

 

अंतिम फेरी निकाल, ठाणे

  • सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम : असणं-नसणं
  • सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय : दिल-ए-नादान
  • सवोत्कृष्ट एकांकिका तृतीय : मजार

वैयक्तिक पारितोषिके

  • सवरेत्कृष्ट दिग्दर्शक :पवन ठाकरे/सुशांत पाटील (असणं-नसणं)
  • सवरेत्कृष्ट लेखन : श्रेयस राजे (असणं-नसणं)
  • सवरेत्कृष्ट अभिनय : विशाल चव्हाण (भूमिका-अनंता, असणं-नसणं)
  • सवरेत्कृष्ट अभिनय : निकिता घाग (भूमिका – कृतिका, रात्रीस खेळ चाले)
  • सवरेत्कृष्ट प्रकाश योजना : महेश सापणे (दिल-ए-नादान)
  • सवरेत्कृष्ट नेपथ्य : मयुर मांडवकर (मजार)
  • सवरेत्कृष्ट संगीत : योगेश बाद्रे/प्रथमेश कासुर्डे (मजार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 2:24 am

Web Title: loksatta lokankika competitions 10
Next Stories
1 कल्याणच्या इमारतींचा पाया खोलात!
2 टीएमटीची नवी इंजिने कार्यशाळेत धूळ खात!
3 रंगभूमीच्या भविष्यकाळाची प्रचीती देणारी उत्साही सळसळ..
Just Now!
X