दहावी, बारावीनंतर उच्च शिक्षणाचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुले असतात. मात्र यापैकी कोणत्या वाटेने गेल्यावर आपल्याला यशस्वी करिअर घडवता येईल, हे विद्यार्थ्यांना उमजत नाही. यातूनच चुकीच्या करिअरची निवड केली जाऊन हाती अपयश येते. अशी वेळ टाळायची असेल, तर येत्या ५ व ६ जून रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेला अवश्य भेट द्या.

‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स प्रस्तुत लोकसत्ता मार्ग यशाचा सहप्रायोजक विद्यालंकार क्लासेस’ या करिअर कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी ‘करिअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तर वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. सागर मुंदडा आणि डॉ. अमोल अन्नदाते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विधि शिक्षणाविषयी प्रा. नारायण राजाध्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. भारतीय डिजिटल पार्टी अर्थात ‘भाडिपा’चे सारंग साठय़े हे वेबविश्वातील करिअरसंधींबाबत मार्गदर्शन करणार असून संवाद-पटकथा लेखन या विषयावर सचिन दरेकर संवाद साधतील. टीव्ही पत्रकारितेच्या ग्लॅमरमागची मेहनत ‘एबीपी माझा’चे पत्रकार प्रसन्न जोशी हे उलगडून सांगतील. याचसोबत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

या सर्व तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. सोबतच आपल्या मनातील प्रश्न आणि शंकांचे समाधानही या तज्ज्ञांशी थेट संवाद साधून करता येईल.

लक्षात ठेवा

* या कार्यशाळेसाठी प्रत्येकी ५० रु. शुल्क भरून नोंदणी करावी लागेल.

* खालील ठिकाणी स. १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात प्रवेशिका मिळू शकतील.

– जिन्स जंक्शन, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)

-टिपटॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड चेक नाक्याजवळ, ठाणे

– लोकसत्ता कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेवर, नवजीवन रक्तपेढीच्या शेजारी, नौपाडा, ठाणे (प.)

*  त्याचबरोबर पुढील लिंकवरूनही विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. http://tiny.cc/margyashacha2019thane

कधी?

५ व ६ जून

कुठे?

टिपटॉप प्लाझा, ठाणे

प्रायोजक

या कार्यशाळेचे ‘टायटल स्पॉन्सर’ ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ हे असून सहप्रायोजक ‘विद्यालंकार क्लासेस’ आहेत. एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन ओव्हरसीज, सासमिरा, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, युक्ती हे ‘पॉवर्डबाय पार्टनर’ असून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग पार्टनर आहे.