आठवडय़ातून चार ते पाच दिवस कचऱ्याचा दरुगध संपूर्ण शहरात पसरलेल्यामुळे कल्याण शहरातील वातावरण प्रदूषित होते. शिवाय अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत.

 वैदेही जोशी, कल्याण</strong>

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

जीवितहानी होण्याची वाट बघत आहे का?

आठ ते दहा वर्षांपासून आधारवाडीतील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न येथील जनतेला भेडसावत आहे. अनेक वेळा येथील डम्पिंग ग्राऊंड दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी आंदोलन झाली आहेत. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आहे.

अविनाश ओंबासे, कल्याण

अनेक शंकांनी कल्याणकर त्रस्त

या डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण शहरात धूर पसरला होता. घरातील खिडक्या उघडल्यानंतर धूर आत येत होता. लहान मुले तसेच वयोवृद्ध माणसांना श्वसनाचा त्रास जडला आहे.

 सर्वेश नाचणे, कल्याण 

आधारवाडीचे ‘देवनार’ होण्याची भीती

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला लागल्यामुळे कल्याण (पश्चिम) आगीच्या धुरामध्ये सामावले गेले. मात्र आता हे डम्पिंग ग्राऊंड शहराच्या मध्यभागी आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दरुगधी सहन करावी लागते.

-प्रशांत दांडेकर, कल्याण

ही आग लागली की, लावली?

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या उग्र वासाने आयुष्यभर हैराण झालेले नागरिक आता धुराशीही झुंज देत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आगीमागचे नेमके कारण स्थानिक प्रशासनाने शोधावे.

-अजय कदम, कल्याण