News Flash

आषाढी एकादशीनिमित्त वसईत भक्तीरसाची पर्वणी

‘लोकसत्ता’तर्फे शनिवार, १३ जुलै रोजी भक्तीगीतांची मैफल

‘लोकसत्ता’तर्फे शनिवार, १३ जुलै रोजी भक्तीगीतांची मैफल; संजीव चिम्मलगी आणि मुग्धा वैशंपायन यांचे गायन

वसई : विटेवरल्या विठ्ठलाचे चरण नयनांत साठविण्यासाठी वारी निघते आणि आषाढी एकादशीला पंढरपुरात येऊन नामरंगात बुडून जाते. भक्तीचा हाच आनंद स्वरांमध्ये अनुभवण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘नामरंगी रंगले’ ही भक्तीगीतांची मैफल रंगणार आहे. शनिवार १३ जुलै रोजी वसईच्या पारनाका येथील भंडारी सभागृहात संध्याकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक संजीव चिम्मलगी आणि मुग्धा वैशंपायन सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचलेला सांस्कृतिक वारसा. विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी आणि टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यवरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आळंदी आणि देहूपासून निघालेला वैष्णवांचा सागर आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेला आहे. अनेकांच्या ओठी मग संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे अभंग येऊ लागतात. सारा आसमंत भक्तिमय होऊन जातो. आबालवृद्ध त्या तालावर भक्तिरसात न्हाऊन निघतात.  याच भक्तीमय वातावरणात आषाढीचे एकादशीचे निमित्त साधून लोकसत्तातर्फे ‘नामरंगी रंगले’ या भक्ती गीतांच्या मैफिलिचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय गायक संजीव चिम्मलगी आणि ‘लिटिल चॅम्प’ मधून घराघरांत पोहोचलेली गायिका मुग्धा वैशंपायन या मैफलीत सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका त्याच दिवशी सकाळी १० पासून सभागृहावर उपलब्ध असतील.

काय?

‘नामरंगी रंगले’

कधी?

शनिवार, १३  जुलै

सायंकाळी ६.३०

कुठे?

भंडारी सभागृह, पारनाका, वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 3:44 am

Web Title: loksatta organized devotional songs concert at vasai zws 90
Next Stories
1 योजनांची परिणामकारक अंमलबजावणी हवी
2 पर्यटनस्थळांवर शुकशुकाट!
3 धबधबे बहरले, पर्यटक ओसरले
Just Now!
X