06 March 2021

News Flash

संतुलित आहार हीच सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली..

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ कार्यक्रमात ठाणेकरांना सल्ला

'लोकसत्ता पूर्णब्रह्म'च्या चर्चासत्रात आहारतज्ज्ञ शिल्पा जोशी, ऐश्वर्या कुंभकोणी, सुखदा भट्टे-परळकर आणि शेफ शंतनु गुप्ते यांनी उपस्थितांशी संवाद साधला.           (छाया : दिपक जोशी)

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ कार्यक्रमात ठाणेकरांना सल्ला

बदलत्या जीवनशैलीत आहार संतुलित ठेवताना स्वाद आणि पौष्टिकतेची सांगड घालण्यासाठी नेमके काय करायला हवे? खाद्यपदार्थाची चव राखतानाच शरीरस्वास्थ्यासाठी आवश्यक घटकांचे प्रमाण कसे राखावे, अशा खाद्यविषयक शंकांचा उलगडा गुरुवारी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या कार्यक्रमात ठाणेकरांना झाला. संतुलित आहारपद्धतीची ओळख करून देणाऱ्या पाककृती चित्रफितींच्या माध्यमातून दाखवत या चर्चासत्रात आहारतज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आहाराचे सूत्र जाणून घेण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती. ‘स्वादिष्ट पण पौष्टिक’ या सूत्रावर बेतलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’या चर्चासत्रात आहारतज्ज्ञ शिल्पा जोशी, ऐश्वर्या कुंभकोणी, सुखदा भट्टे-परळकर आणि शेफ शंतनु गुप्ते यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या देहयष्टीनुसार सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत खाद्यपदार्थ विशिष्ट वेळेत आणि प्रमाणात कसे खायला हवेत, याविषयी खवय्यांनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे मत आहारतज्ज्ञांनी चर्चासत्रात मांडले.

आहारातील पौष्टिकता आणि प्रमाण हे मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी उपयुक्त ठरते, असे मत ऐश्वर्या कुंभकोणी यांनी व्यक्त केले. निरोगी आरोग्यासाठी देवाच्या नैवेद्याप्रमाणे चौकस आहार असणे गरजेचे आहे, असा सल्ला शिल्पा जोशी यांनी दिला. अनेकदा आहारात कबरेदकांचे प्रमाण जास्त असते ते टाळायला हवे. कच्च्या वा शिजवलेल्या भाज्या, डाळी किंवा उसळी आहारात नियमित असाव्यात, असे सुखदा भट्ट यांनी सांगितले. तसेच पौष्टिक आहार चविष्ट कसा बनवावा, याविषयी शेफ शंतनु गुप्ते यांनी खुमासदार शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी या तज्ज्ञांशी संवाद साधला. लोकसत्ता-चतुरंगच्या आरती कदम यांनी ‘पूर्णब्रह्म’ या अंकाविषयी श्रोत्यांना माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 1:24 am

Web Title: loksatta purnabramha 4
Next Stories
1 डोक्यावर हातोडीने प्रहार करुन पत्नीची हत्या, मेहुणीला ऑडिओ क्लिप पाठवून दिली कबुली
2 नवी मुंबईत व्यापाऱ्याची भररस्त्यात गोळया झाडून हत्या
3 ठाण्यात वर्तुळाकार वाहतूक बदल
Just Now!
X