• अभिनेत्री सायली पाटील यांची भेट
  • दैनंदिन, आठवडय़ाच्या आणि बंपर पारितोषिकांची लयलूट

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ अखेरच्या टप्प्यात आला असून या महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी कल्याण येथील ‘द रेमण्ड शॉप’ येथे पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘गणपत्ती बाप्पा मोरया’ या लोकप्रिय मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली पाटील हिने लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या शो रूम्सना भेट दिली. या वेळी भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक देण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, कल्याण शाखेचे व्यवस्थापक राजाराम प्रसाद, ‘द रेमण्ड शॉप’चे हितेश भारद्वाज आणि राजदीप इलेक्ट्रॉनिकचे प्रवीण जैन उपस्थित होते. येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार असून खरेदीवर आकर्षक पारितोषिके जिंकण्यासाठी शेवटचा आठवडा उरला आहे.

वीकएण्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून पितांबरी हे सहप्रयोजक आहेत. ट्रॅव्हल पार्टनर केसरी, बॅकिंग पार्टनर युनियन बँक, वेलनेस पार्टनर यू आर फिटनेस्ट, हॉस्पिटॅलिटी पार्टनर द ग्रिल हाऊस त्याचबरोबर टिपटॉप प्लाझा, कलाकृती, ऑरबिट, कॅरॉन किड्स हे असोसिएट पार्टनर आहेत.

तन्वीशता, वामन हरी पेठे सन्स, प्रशांत कॉर्नर, मॅक्रो फाइन हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. तसेच अथर्व स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग केअर हे बंपर गिफ्ट पार्टनर आहेत. सरलाज् स्पा अ‍ॅण्ड सलून, ओमकार किचन वर्ल्ड, राजदीप इलेक्ट्रॉनिक, कलानिधी, एस.कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड, चॉइस सारीस् अ‍ॅण्ड ड्रेसेस आणि द रेमण्ड शॉप हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

  • लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  • ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन ग्राह्य़ धरली जाणार नाहीत.
  • दररोज ड्रॉप बॉक्समधून लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्यांचंी निवड केली जाईल.
  • विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध केली जातील.
  • ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरांतील दुकानदारांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
  • महोत्सवातील सर्व योजनांना अटी-शर्ती लागू आहेत.