बदलती जीवनशैली, अनियमित आहार, हवामानातील बदल यामुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासले आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे ११ व १२ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. विशेष परिसंवाद व प्रदर्शनाचे आयोजनही या वेळी करण्यात आले आहे.
आरोग्यसंदर्भातील प्रश्न, जीवनशैली, आहार, मानसिक आजार या विषयांवर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येईल. आहाराचे प्रमाण, वेळापत्रक आणि त्याचा आरोग्याशी संबंध याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य शैलेश नाडकर्णी हे मार्गदर्शन करणार आहे. ‘आहारातून आरोग्य’ या विषयावर ते संभाषण करतील. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि रक्तदाब यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळेच डॉ. राजेंद्र आगरकर हे ‘मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, तर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे हे ‘ताणतणाव आणि आरोग्य’ या विषयावर विवेचन करणार आहेत.

प्रवेशिका कुठे मिळेल?
या कार्यक्रमासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आहे. ६ सप्टेंबरपासून या कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळतील. त्यासाठी ‘लोकसत्ता’, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, कॉसमॉस बँकेच्या वर, नौपाडा, ठाणे (प) आणि टिप-टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा.
* काय? : लोकसत्ता आरोग्यमान भव
*कधी? : ११, १२ सप्टेंबर. (सकाळी ९ ते दुपारी २)
*कुठे? : टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (प.)