लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल  

ठाण्यातील मासुंदा तलवाच्या काठावर रविवारी सायंकाळी सुट्टीनिमित्त फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांनी जुन्या-नवीन हिंदी तसेच मराठी गीतांचा मनमुराद आनंद लुटला. गायकांनी उत्तम सादरीकरण केल्याबद्दल ठाणेकरांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिजन्सी ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल अशा उत्साही वातावरणात पार पडला.

ठाणेकरांनी तुडुंब गर्दी केलेल्या या फेस्टिव्हलमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा पार पडली. त्यामध्ये अनेक जणांनी सहभागी होऊन गिफ्ट कूपन्स जिंकली. सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव याने कार्यक्रमाला हजेरी लावून ‘अमला पगला दिवाना’ हे गीत सादर केले. त्यावर नागरिकांनी ठेका धरला.

मासुंदा तलावाच्या दत्त विसर्जन घाटाजवळ हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. चिंतामनी सोहनी, अपर्णा नागरगट्टी आणि दीपाली देसाई या कलाकारांनी हिंदी आणि मराठी गाणी सादर केली. या गायकांनी कैसी पहेली है, ये शाम मस्तानी, दिलबर मेरे, ही गुलाबी हवा आणि जगू कसा तुझ्याविना ही गाणी झोकात पेश केली. फेस्टिव्हलला ठाणेकरांनी मोठय़ा उपस्थिती लावली. परिसर गर्दीने फुलून गेला होता.

खरेदीसोबतच बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा रिजन्सी ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल सध्या उत्साहात सुरू आहे. तो १७ फेब्रुवारीपर्यंत सुरूराहील. या खरेदी उत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. रिजन्सी ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये दररोज निवडल्या जाणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ईशा टुर्स हे या शॉपिंग फेस्टिव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. टीजेएसबी हे बँकिंग पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, कृष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत, तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँडमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रह्मविद्या हे हीलिंग पार्टनर आहेत.

रसिकांचे प्रेम महत्त्वाचे – सिद्धार्थ

या कार्यक्रमात  अभिनेता सिद्घार्थ जाधव याने ठाणेकरांशी संवाद साधला. सर्व कलाकार सामान्यच असतात, मात्र रसिकांचे प्रेम कलाकारांना असामान्य बनवते, असे मत या वेळी सिद्धार्थने व्यक्त केले.

सहभागासाठी

  • लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  • ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.
  • ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.
  • या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.