News Flash

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला उत्साही प्रतिसाद   

पहिल्याच दिवशी बक्षिसांची लयलूट; अभंग रिपोस्ट बँडचे सादरीकरण

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमात शनिवारी अभंग रिपोस्ट बँडचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.     ( छाया: दिपक जोशी)

पहिल्याच दिवशी बक्षिसांची लयलूट; अभंग रिपोस्ट बँडचे सादरीकरण

ठाण्यातील सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या काठावर शनिवारी सायंकाळी झालेले अभंग रिपोस्ट बँडचे दर्जेदार सादरीकरण आणि या बँडच्या ठेक्यावर विठ्ठलनामाचा जप करत थिरकणारे ठाणेकर.. अशा उत्साही वातावरणात ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

या फेस्टिव्हलमध्ये ठाणेकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी प्रश्नमंजूषा आणि विविध खेळांत सहभागी होऊन गिफ्ट कूपनची बक्षिसे जिंकली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जांभळी नाक्याचा परिसर गर्दीने फुलला होता.

मासुंदा तलावाशेजारच्या जांभळीनाका परिसरात शनिवारी सायंकाळी ‘लोकसत्ता’च्या वतीने ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. त्यात सुयोग गोसावी, विराज आचार्य, पीयूष आचार्य, स्वप्निल तर्फे , दुष्यंत देवरुखकर, अजय वाव्हळ, उन्मेश पाटील आणि रुचीर चव्हाण या तरुणांनी अभंग रिपोस्ट बँडचे सादरीकरण केले. त्यामध्ये ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’, ‘मनी नाही भाव’ आणि ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा’ हे अभंग वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आले. त्याचबरोबर विठ्ठल आणि पांडुरंगाच्या नावाचा जपही करण्यात आला.

बँडच्या माध्यमातून झालेल्या विठ्ठल आणि पांडुरंगाच्या जपामध्ये ठाणेकरही दंग झाले होते, तर बँडच्या ठेक्यावर अनेक जण थिरकले. काहींनी टाळ्यांच्या गजरात विठ्ठलनामाचा ‘जप’ केला. संत एकनाथ महाराजांचे ‘दादला नको गं बाई’ हे भारूडही तरुणांनी बँडच्या साहाय्याने सादर केले. मासुंदा तलावाकाठी फेरफटका मारण्यासाठी तसेच मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ठाणेकरांनी शॉपिंग फेस्टिव्हललाही गर्दी केली. या फेस्टिव्हलमध्ये ठाणे शहराविषयी तसेच वाहतूक नियमांविषयीचे प्रश्न ठाणेकरांना विचारण्यात आले. त्याची अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्यांना बक्षीस म्हणून ‘गिफ्ट कूपन’ देण्यात आली. या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला आणि बक्षिसांची लयलूट केली.

आज जीवनगाणे कार्यक्रम

ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील अभंग रिपोस्ट बँडला उदंड प्रतिसाद लाभला. या फेस्टिव्हलमध्ये आज, रविवारी ‘जीवनगाणे’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये जयंत पिंगुळकर आणि प्रीती निमकर गाणे सादर करणार आहेत. ऋग्वेद बेंद्रे आणि त्याचे सहकारी नृत्य सादर करणार आहेत, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमात लोकसत्ता संपादक शिफारस पात्र आणि सध्याच्या बहुचर्चित ‘चि.सौ.कां. रंगभूमी’ या नाटकातील प्रमुख अभिनेत्री संपदा जोगळेकर – कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

सहभागासाठी..

  • लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदार त्यांना एक कूपन देतील.
  • कूपन भरून ते दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • ’ अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.
  • ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.
  • या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

कार्यक्रमाचे प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ‘ईशा टुर्स’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. ‘डीजी ठाणे’ हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, कृष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत, तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. ‘लँडमार्क मर्सिडीज’ हे लक्झरी कार पार्टनर आहेत. ‘प्रॉम्पक्राफ्ट’ हे प्लॅटिनम पार्टनर असून ‘ब्रह्मविद्या’ हे हीलिंग पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:11 am

Web Title: loksatta thane shopping festival 6
Next Stories
1 धावपटूंवरील अन्यायाचा जाब
2 पहिल्या वर्षांचा अर्थसंकल्प शेवटच्या वर्षांत!
3 पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
Just Now!
X