ग्राहकांच्या उदंड प्रतिसादात सुरू असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये रविवारी सायंकाळी ठाणेकरांनी जुन्या आणि नव्या मराठी-हिंदी गाण्यांचा आस्वाद घेतला.

ठाण्यातील सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या काठावर ‘जीवनगाणी’ कार्यक्रम झाला. यावेळी जयंत पिंगुळकर आणि प्रीती निमकर या गायकांनी बहारदार गाणी सादर करून कानसेनांना तृप्त केले. यावेळी अनेक ठाणेकरांनी प्रश्नमंजूषा आणि विविध खेळांमध्ये सहभागी होऊन ‘गिफ्ट कूपन’ची बक्षिसे जिंकली.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

एखादी वस्तू खरेदी केल्यावर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी घेऊन येणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे यंदाचे सहावे पर्व आहे. या पर्वातील महोत्सवात नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. रविवारी मासुंदा तलावाकाठी फेरफटका मारण्यासाठी तसेच मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी शॉपिंग फेस्टिव्हललाही गर्दी केली.

‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘हिची चाल तुरुतुरु’, ‘परदा हे परदा’ आणि ‘पिया तू अब तो आ जा’ यासारखी जुनी-नवी मराठी-हिंदी गाणी जयंत पिंगुळकर आणि प्रीती निमकर यांनी सादर केली. रसिकांनी गाण्यांवर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला.

या फेस्टिव्हलमध्ये ठाणे शहराविषयी विविध प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. त्याची अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्यांना बक्षीस म्हणून ‘गिफ्ट कूपन’ देण्यात आली. टेबल टेनिस बॉल गेम, विविध ब्रिदवाक्ये तयार करणे यासारखे विविध खेळ यावेळी खेळले गेले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जांभळी नाक्याचा परिसर गर्दीने फुलला होता.

कार्यक्रमादरम्यान एआरएन समूहाने नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता संपादक शिफारस’पात्र आणि सध्याच्या बहुचर्चित ‘चि.सौ.कां. रंगभूमी’ या नाटकातील प्रमुख अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी उपस्थित होत्या. खरेदीसाठी जाताना फक्त हौस म्हणून जाऊ नये तर गरज म्हणून जायला हवे. लोकसत्ता उत्तमोत्तम कार्यक्रम वाचकांसाठी आयोजित करत असते. ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा त्यापैकीच एक आहे, असे कौतुकोद्गार संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी काढले. या कार्यक्रमाला ‘सारथी’चे अमोल धर्मे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ‘ईशा टुर्स’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिप-टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. ‘डीजी ठाणे’ हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, कृष्णा स्वीट आणि लिनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत, तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. ‘लँडमार्क मर्सिडीज’ हे लक्झरी कार पार्टनर आहेत. ‘प्रॉम्पक्राफ्ट’ हे प्लॅटिनम पार्टनर असून ‘ब्रह्मविद्या’ हे हीलिंग पार्टनर आहेत.

सहभागासाठी..

  • लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदार त्यांना एक कूपन देतील.
  • कूपन भरून ते दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.
  • ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.
  • या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.