लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल

फोक मस्ती बँडचे दर्जेदार सादरीकरण आणि सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या गाण्यांनी शनिवारी सायंकाळी ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला सांस्कृतिक उंचीवर नेऊन ठेवले. प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या काठावर रंगलेल्या या कार्यक्रमाचा ठाणेकर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.

या फेस्टिव्हलमधील प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊन अनेक ठाणेकरांनी गिफ्ट कूपन जिंकल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मासुंदा तलावाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या फेस्टिव्हलमध्ये विपुल पांचाल, सचिन गुलदगडे, रोशन आडे, अमय चोपा आणि प्रिन्स मँगन या तरुणांनी फोक बँडचे सादरीकरण केले. आमची मुंबई, लाइफ इज क्रेझी, तंतर मंतर, माया रे लागी आदी गाण्यांचे सादरीकरण फोक बँडने केले. त्यांच्या गाण्यांवर रसिक थिरकत होते.

या कार्यक्रमात वैशाली सामंत यांनी ऐका दाजिबा, ढिपारी ढिपांग आदी गाणी सादर केली. कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. रिजन्सी ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल १७ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यात दररोज निवडल्या जाणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, वातानुकूलन यंत्र आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज देऊन गौरवण्यात येणार आहेत.

आज ‘जीवनगाणी’ 

लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना आज, रविवारी जीवनगाणी कार्यक्रमात जुन्या-नव्या गाण्यांच्या मैफलीचा आनंद लुटता येईल. या कार्यक्रमात चिंतामणी सोहनी आणि अपर्णा नागरगट्टे गाणार आहेत. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवही उपस्थित राहणार आहे.

  • कधी? – आज, १० फेब्रुवारी, वेळ – सायंकाळी ६.३० ते ९.
  • कुठे? – गणेश विसर्जन घाट, साईकृपा हॉटेलसमोर, मासुंदा तलाव, ठाणे (प)

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ईशा टुर्स हे या शॉपिंग फेस्टीव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. टिजेएसबी हे बँकींग पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डिजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजीटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, कृष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटीनम पार्टनर आहेत. तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदीर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँन्डमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रम्हविद्या हे हिलींग पार्टनर आहेत.

सहभागासाठी

  • लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  • ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळले जातील.
  • ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.
  • या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.